मुंबई : आमदार मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिष्टमंडळाने नवनीत राणा MRI फोटो प्रकरणी ( Navneet Rana MRI Photo ) लिलावती रुग्णालय प्रशासनाच्या विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात ( Bandra Police Station ) तक्रार दाखल केली ( Complaint lodged against Lilavati hospital administration ) आहे.
मोबाईल आतमध्ये गेला कसा ? : एखादा रुग्ण MIR कक्षात जातो तेव्हा त्याला सर्व गोष्टी बाहेर काढून ठेवायल्या सांगितल्या जातात. मग नवनीत राणा यांचे एमआयआर स्कॅन सुरु असताना फोटोसेशनसाठी मोबाईल आतमध्ये कसा नेण्यात आला? यावेळी जर रेडिएशनमुळे स्फोट झाला असता तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला. काल किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांच्यासह शिवसेना नेत्यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन रुग्णालय प्रशासनाला त्या फोटोबाबत जाब विचारला होता.
धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार : खासदार नवनीत राणा यांचा लीलावती रुग्णालयात एमआरआय करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालयाच्या प्रशासनावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत शिवसेनेने प्रवक्ता मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावेळी, राज्याचे गृहमंत्री तसेच वेळ पडल्यास धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे कायंदे यांनी सांगितले.
असा झाला प्रकार : लिलावती रुग्णालयात खासदार नवनीत राणा यांना मानदुखीचा प्रचंड त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी यामुळे एमआयआर करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, राणा यांनी एमआयआर करतानाचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले. शिवसेनेने यावरुन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. एमआरएस सुरू असताना फोटो कसे काढले गेले? एमआरआय सारख्या पक्षात रुग्णालयाचे नातेवाईकांना किंवा कोणालाही मोबाईल किंवा इतर धातूंच्या वस्तू वापरण्यास मुभा असते. मग राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? जाब विचारला. रुग्णालय प्रशासनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा इशारा दिला होता. आज शिवसेना प्रवक्ता मनीषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली परिवहन मंत्री अनिल परब, युवासेना सचिव राहुल कनाल आदी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने वांद्रे पोलीस ठाण्यात या संदर्भात रीतसर तक्रार केली.
अशा ठिकाणी व्हिडीओ काढणे गुन्हा : रुग्णालयात एमआरआय सारख्या संवेदनशील ठिकाणी व्हिडिओ काढणे गुन्हा आहे. त्यामुळे नवनीत राणा प्रकरणात रुग्णालय प्रशासन जबाबदार असून, त्यांनी याबाबत खुलासा करणे गरजेचे आहे. त्यामुळे वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, राणा दाम्पत्याने रुग्णालयाच्या आवारात संवेदनशील ठिकाणी केलेल्या व्हिडिओचे सीसीटीव्ही फुटेज मागून त्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसेच हा रुग्णालयाच्या प्रतिष्ठेचा विषय असून, या प्रकरणी गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत. शिवाय वेळ पडल्यास धर्मदाय आयुक्तांकडे दाद मागणार असल्याचे मनीषा कायंदे यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आणि नवनीत राणा हा वाद पुन्हा चिघळणार आहे.