ETV Bharat / city

फोन टॅपिंग प्रकरण : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा, नाना पटोले यांची मागणी - Nana Patole on devendra fadnavis

फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे उकरून काढण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole demand devendra fadnavis Inquiry
देवेंद्र फडणवीस चौकशी मागणी नाना पटोले
author img

By

Published : Feb 27, 2022, 7:50 PM IST

मुंबई - फोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे उकरून काढण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेची चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा - मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयात पहिल्यांदाच काॅर्नियल प्रत्यारोपण

राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१७-१८ साली माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपातील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदेशीर टॅप करण्यात आले होते. अंमली पदार्थांचा व्यापार करत असल्याचे दाखवून आमचे फोन टॅप केले. माझे नाव अमजद खान असे ठेवले होते, असे नाना पटोले यांनी सांगितले. तसेच, बच्चू कडू यांचे निजामुद्दीन बाबू शेख, अशी मुस्लीम नावे ठेवली होती. फोन टॅपिंगचा मुद्दा मी विधानसभेतही उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या चौकशीत रश्मी शुक्ला दोषी असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हा दाखल केल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले आहे.

दहशतवादी कारवाया, अंमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु, आमचा याच्याशी काहीही संबंध नसताना तो दाखवून फोन टॅप केले आहेत. फोन टॅप करून एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे, हा गुन्हा आहे. हा प्रकार व्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारा असून केंद्रातील मोदी सरकारने अशाच पद्धतीने पेगॅससच्या माध्यमातून मंत्री, राजकीय नेते, न्यायपालिका, पत्रकार यांची हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे, असा आरोप करत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती, असे नाना पटोले म्हणाले. आता रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, फोन टॅपिंगचे रेकॉर्ड त्यांनी कोणाला दिले? फोन टॅपिंगचा मुळ उद्देश काय होता? रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग करण्याचे आदेश कोणी दिले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत. त्यामुळे, राज्य सरकारने फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीची व्याप्ती वाढवून जलदगतीने तपास करावा आणि या प्रकरणाचा खरा मास्टरमाईंड कोण हे शोधून काढून त्याच्यावरही कडक कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

हेही वाचा - राज्यात ठीक ठिकाणी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.