मुंबई - रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राज्यसरकार कायदेशीर कारवाई करणार आहे. फोन टॅपिंग प्रकरणात ही कारवाई केली जाणार आहे. तर परमबीर सिंग यांच्या विरोधातही शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणार आहे.
निवृत्त न्यायाधीशामार्फत ही चौकशी करण्यात येणार आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्याचे महाधिवक्ते, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. वर्षा बंगल्यावर ही बैठक झाली.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला आहे. याच दरम्यान, कमिशनर ऑफ इंटेलिजन्स असताना रश्मी शुक्ला यांनी पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचा मांडलेला मुद्दा पुन्हा नव्याने चर्चेत आला. या प्रकरणात रश्मी शुक्ला यांनी काही लोकांचे फोन टॅपिंग करून भ्रष्टाचाराचा आरोप केला.
गृह मंत्र्यांनी केले चौकशीचे स्वागत -
गृह मंत्री अनिल देशमुख यांनी या बाबत ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी लावली तर, मी त्याचे स्वागत करीन असे म्हंटले आहे.