ETV Bharat / city

बलात्कारातून गर्भवती अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी उच्च न्यायालयात याचिका - अल्पवयीन मुलीची गर्भपाताकरिता उच्च न्यायालयात याचिका

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारातून गर्भवती झालेल्या मुलीच्या वडिलांकडून मुंबई उच्च न्यायालयात गर्भपात करण्याकरिता शुक्रवार 20 मे रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुटीकालीन न्या. नितीन सांब्रे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठासमोर 23 मे रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली आहे.

गर्भपाताकरिता उच्च न्यायालयात याचिका
गर्भपाताकरिता उच्च न्यायालयात याचिका
author img

By

Published : May 21, 2022, 8:23 AM IST

Updated : May 21, 2022, 9:55 AM IST

मुंबई - बलात्कारातून गर्भधारणा झालेल्या अल्पवयीन मुलीने गर्भपात करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. सुटीकालीन न्या. नितीन सांब्रे आणि न्या. अनिल पानसरे यांच्या खंडपीठापुढे शुक्रवारी याचिकेचा उल्लेख करण्यात आला. न्यायालयाने याची दखल घेऊन जे.जे. शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. मुलीच्या वतीने तिच्या वडिलांनी ही याचिका केली आहे.

काय आहे याचिका - अल्पवयीन मुलीच्या वडिलांकडून याचिकेमध्ये म्हटले आहे की मुलगी अल्पवयीन आहे आणि या सर्व प्रकारामुळे मानसिक ताण सहन करत आहे. त्यामुळे तिला गर्भपात करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची असून ती 13 आठवड्यांची गर्भवती आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली नसून तो फरार आहे. खंडपीठाने याचिकेवर 23 मे रोजी पुढील सुनावणी निश्चित केली आहे. त्यावेळी जे.जे. शासकीय रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाला अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा - Minor cousin Rape case : अल्पवयीन चुलत बहिणीवर सहा महिने बलात्कार, पीडिता गरोदर झाल्यानंतर गुन्हा दाखल

Last Updated : May 21, 2022, 9:55 AM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.