मुंबई मुंबई उच्च न्यायालयामध्ये Mumbai High Court जैन समाजाच्यावतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये असे म्हटले आहे, की टीव्हीवर तसेच सार्वजनिक ठिकाणी करण्यात येणाऱ्या मांसाहारशी संबंधित जाहिरातबाजी बंद करण्यात यावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या सोमवारी 26 सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता जैन समाजाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेत असे म्हटले आहे. की या जाहिरातींमुळे त्यांच्या शांततेत जगण्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता hearing in High Court आहे. मांसाहार करायचा असेल, तर त्यांनी तो खुशाल करावा. मांसाहाराला आमचा विरोध नाही. जर कुणाला मांसाहार करायचा असेल, तर त्यांनी तो खुशाल करावा मांसाहाराला आमचा विरोध नाही. पण शाकाहारी लोकांच्या घराजवळ त्याची जाहीरात करणं हे त्या समुदायाच्या मुलभूत अधिकारांवर गदा आणल्यासारखं आहे, असा आरोप या जनहीत याचिकेतून करण्यात आला आहे. श्री ट्रस्टी आत्म कमल लब्धीसुरीश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट, सेठ मोतीशा धर्मादाय ट्रस्ट आणि श्री वर्धमान परिवार आणि ज्योतींद्र शाह यांनी एकत्रितपणे ही याचिका दाखल केली आहे.
प्रोत्साहन देत असल्याचा दावा मुख्य म्हणजे रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी आणि धार्मिक स्थळाशेजारी करण्यात येणाऱ्या जाहिरांतीसह टिव्ही आणि सर्व प्रकारच्या मीडियावर करण्यात येणाऱ्या मांसाहाराच्या जाहिरांतीवर बंदी आणण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. कारण या जाहिरातींतून विक्रेते हे प्राणी पक्षांच्या हत्येला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करत त्यातून कायद्याचं उल्लंघन होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी याचिकेत गुजरात, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांनी अश्याप्रकारची बंदी लावल्याचा दाखलाही देण्यात आला आहे. यामुळे मांसाहाराच्या जाहिरातींवर सरसकट बंदीची मागणी करत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. आता या प्रकरणात उद्या हायकोर्ट काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.