ETV Bharat / city

डीजीआयपीआर अधिकाऱ्यांच्या 2019 मधील इस्राईल दौऱ्याचा पेगाससशी संबंध? उच्च न्यायालयात याचिका दाखल - मुंबई उच्च न्यायालय

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना डीजीआयपीआरचे पाच अधिकरी इस्राईल दौऱ्यावर गेले होते. हा दौरा करत असताना या पथकाने कोणतेही नियम पाळले नाहीत. तसेच संबंधित दौऱ्याची परवानगी घेतली होती का? असे प्रश्न याचिकेतून विचारण्यात आले आहेत.

Mumbai High Court
मुंबई उच्च न्यायालय
author img

By

Published : Aug 6, 2021, 12:02 PM IST

मुंबई - नोव्हेंबर 2019 मध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी यांनी केलेला इस्राईल दौरा कशासाठी होता? या दौऱ्याचा संबंध पेगासस प्रकरणाशी आहे का? याबाबत प्रश्न उपस्थित करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासंदर्भात न्यायालयाने आदेश दिले आहेत.

न्यायालयाने मागितली सविस्तर माहिती -

"पेगासस स्पायवेअर" चा वापर करून देशातील मोठे नेते, पत्रकार मंडळी आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींवर नजर ठेवली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केंद्र सरकारवर केला आहे. फोन हॅक करून या सर्व मंडळींवर नजर ठेवली जायची असा गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना डीजीआयपीआरचे पाच अधिकारी इस्राईल दौऱ्यावर गेले होते. हा दौरा करत असताना या पथकाने कोणतेही नियम पाळले नाहीत. तसेच संबंधित दौऱ्याची परवानगी घेतली होती का, असे प्रश्न याचिकेतून विचारण्यात आलेत. तसेच मीडियाचा वापर वाढविण्यासंदर्भात इस्राईलमध्ये दौरा का होता? असा प्रश्नही याचिकेतून विचारण्यात आला आहे. लक्ष्मण बुरा यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने आता या दौऱ्यासंबंधीत सर्व माहिती मागवली आहे. मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी घेण्यात आली आहे. चार आठवड्यामध्ये संबंधित विभागाने यावर स्पष्टीकरण देण्यासंदर्भात न्यायालयाने नोटीस बजावली आहे.

हेही वाचा - Phone tapping: पेगासस स्पायवेअरद्वारे नेते, मंत्री आणि पत्रकारांचे फोन टॅप, वाचा संपूर्ण प्रकरण

आघाडी सरकार निर्मितीच्या काही दिवस आधी दौरा -

राज्यात 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला सत्ता स्थापन करण्यासाठी दीड महिन्याचा वेळ लागला होता. यादरम्यानच डीजीआयपीआरचे अधिकारी इस्राईल दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे इस्राईल दौरा करून पेगासस स्पायवेअरच्या माध्यमातून आघाडी सरकारमधील नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले होते का? अशी शंका आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केली आहे. त्यामुळेच डीजीआयपीआरच्या अधिकाऱ्यांचा इस्राईल दौरा हा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मात्र, यावर माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाकडून पुष्टीकरण देत, राज्याच्या कारभारात वेब मीडियाचा वापर वाढवणे याबाबत हा दौरा केला असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते.

हेही वाचा - Monsoon Session Updates : पावसाळी अधिवेशनाचा 15 वा दिवस; पेगासस प्रकरणावरून रणकंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.