ETV Bharat / city

वांद्रे MTNL इमारतीला आग : डोळ्यांसमोर मरण पाहिल्याची भावना - वांद्रे

मुंबईच्या वांद्रे येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या (एमटीएनएल) इमारतीला भीषण आग लागली आहे. दरम्यान आगीतून बचावलेल्या नागरिकांनी आपण आपले मरण डोळ्यासमोर पाहिल्याची भावना व्यक्त केली आहे

वांद्रे MTNL इमारतीला आग
author img

By

Published : Jul 22, 2019, 8:44 PM IST

मुंबई - वांद्रे येथील एमटीएनएलच्या इमारतीत भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व आग विझवण्यास सुरुवात केली. आगीत आतापर्यंत ८० जणांना वाचवण्यात आले आहे. यात बचावलेल्या नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत

काही क्षणात सगळे वातावरणच बदलून गेले

वांद्रे MTNL इमारतीला आग : डोळ्यांसमोर मरण पाहिल्याची भावना

आपण काम करत असताना अचानक धुराचे लोट वाहू लागले. ते कमी होण्याऐवजी वाढतच राहिले. जेव्हा आम्ही काय झाले हे पाहायला गेलो तेव्हा इमारतीलाच आग लागल्याचे दिसून आले. आम्ही त्वरीत धावत गच्चीवर गेलो. नंतर अग्नीशामक दलाने आम्हाला खाली उतरवले. असे इमारतीत अडकलेल्या काळे व बडवे यांनी सांगितले.

आपण डोळ्यांसमोर मरण पाहिले

आगीचे लोट इतके होते की आता आपण मरणार असेच वाटले होते. पण अग्निशमन दलाचे जवानांकडून आपली सुखरूप सुटका करण्यात आल्याची भावना या घटनेतून बचावलेल्या एका महिलेने दिली आहे. अग्निशमन दलाचे आभार मानताना महिलेचे डोळे पानावले होते. दरम्यान, आग लागलेल्या इमारतीत अजूनही लोक अडकले असण्याची भीती आहे. इमारतीत अडकलेल्या ८० हून अधिक कर्मचाऱ्यांना आतापर्यंत सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. अग्निशमन दलाचे जवानांकडून अजूनही आग विझवण्याचे व नागरिकांनी सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.