ETV Bharat / city

धुळीवंदनामुळे लसीकरणाचे प्रमाण कमी, मुंबईत आज 11 हजार 229 लाभार्थ्यांचे लसीकरण

आजपर्यंत एकूण 10 लाख 98 हजार 081 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यामध्ये 9 लाख 53 हजार 36 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 45 हजार 45 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

corona vaccination
कोरोना लसीकरण
author img

By

Published : Mar 29, 2021, 9:33 PM IST

मुंबई - मुंबईत 11 हजार 229 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण 10 लाख 98 हजार 081 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आज धुळीवंदन असल्याने लसीकरणाकडे मुंबईकरांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.

मुंबईत मागील मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.

हेही वाचा-मुंबईत कोरोनाचा उद्रेक सुरूच, 5888 नवे रुग्ण, 12 जणांचा मृत्यू

लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 11 हजार 229 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. त्यातील 10 हजार 715 लाभार्थ्यांना पहिला तर 514 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 10 लाख 98 हजार 081 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यामध्ये 9 लाख 53 हजार 36 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 45 हजार 45 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

आजपर्यंत एकूण 2 लाख 41 हजार 32 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 41 हजार 498 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 22 हजार 531 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 93 हजार 20 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-कोरोना वाढला; खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा, १०० टक्के आयसीयू ताब्यात घेण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 6 हजार 107 तर आजपर्यंत 7 लाख 58 हजार 69 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 1 हजार 144 लाभार्थ्यांना तर एकूण 54 हजार 886 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 978 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 2 लाख 85 हजार 126 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,41,032
फ्रंटलाईन वर्कर - 2,41,498
ज्येष्ठ नागरिक - 5,22,531
45 ते 59 वय - 93,020
एकूण - 10,98,081

हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यात 5 एप्रिलपासून निर्बंध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.