मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात तिरंगी वातावरण निर्माण झाले आहे. हर घर तिरंगा अभियानामुळे ( har ghar tiranga campaign ) सर्वत्र तिरंगा ध्वजामुळे ( Tricolour Flag ) देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सुद्धा गेले तीन दिवस तिरंगी रंगात ( Tricolour Flag ) न्हाहून निघाली आहे. त्याचसोबत अनेक ठिकाणी फुले भाज्यातून मोठे तिरंगी ध्वज ( Vegetables And Flowers Tricolour Flag ) साकारण्यात आले तिरंगी रोषणाई याद्वारे करण्यात आलेल्या सजावटीने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे
भाज्या आणि फुलांपासून सजावट - या देशाचा खरा मालक, पालनहार, भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेला बळीराजा ( Farmer ) आजही उपेक्षित आहे. अशा ह्या बळीराजाच्या सन्मानार्थ, त्याच्या कार्याचा गौरव व्हावा ही संकल्पना ठेवून शेतकऱ्याकडून उत्पादित गाजर, लसूण, मिर्ची, वांगी, टोमॅटो, भेंडी, तसेच विविध रंगाच्या फुलांचा वापर करून उद्यान खात्याने "आर - मध्य" विभागाच्या प्रवेश द्वाराजवळ भारताच्या नकाशाची कलात्मक, तिरंगी व पर्यावरण पूरक प्रतिकृती ( Vegetables And Flowers Tricolour Flag ) साकारली आहे. 12 बाय 12 या आकारात ही रांगोळी साकारण्यात आली असून त्याकरिता वीस किलो लसूण, 15 किलो टोमॅटो, आठ किलो मिरच्या, सहा किलो गाजर, पाच किलो भेंडी, तसेच झेंडू व अन्य फुलांचा कलात्मक वापर करण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागामार्फ़त मुलुंड पश्चिम स्वप्ननगरी येथील सरदार प्रतापसिंग मनोरंजन मैदानात स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त तिरंगा फूलपाखरू साकारण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिकेच्या उद्यान विभागामार्फ़त मुख्यालयासमोर फुलांची आकर्षक सजावट केली आहे.
घरोघरी तिरंगी ध्वज - बृहन्मुंबई महापालिकेने सुमारे ४० लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समुहाने १ लाख राष्ट्रध्वज ( Tricolour Flag ) महापालिकेला दिले आहेत. असे एकूण ४१ लाख राष्ट्रध्वज तिरंगा सर्व २४ विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचवले आहे. हे ध्वज ( Tricolour Flag ) गेल्या तीन दिवसापासून मुंबईमधील सर्व घरे, दुकाने आणि कार्यालयाच्या इमारतींवर लावण्यात आले आहेत. यामुळे मुंबईमध्ये सर्वत्र तिरंगी ध्वज दिसून येत आहेत.
तिरंगी रोषणाई - महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन विभागामार्फत एकूण २४३ महत्त्वाच्या इमारतींवर तिरंगी विद्युत रोषणाई ( Tricolour Flag ) करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका पुरातन वास्तू ८, महापालिका इमारती ८२, शासकीय इमारती ४८, खासगी इमारती १०५ याप्रमाणे इमारतींचा समावेश आहे. महापालिकेच्या ५१ शाळा इमारतींवर तिरंगा विद्युत रोशणाई करण्यात आली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात २८ निवासी इमारती, १०० वृक्ष, ६० विद्युत खांब, थोर पुरुषांचे १९ पुतळे यांनाही तिरंगी रोषणाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत दररोज सायंकाळी ६.३० वाजेपासून थोड्या-थोड्या अवकाशाने प्रोजेक्शन मॅपिंग करण्यात येत आहे. याला मुंबईकर आणि पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.