ETV Bharat / city

आरे वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर; लोकांचा विरोध मग प्रकल्प कशासाठी?

author img

By

Published : Sep 1, 2019, 5:08 PM IST

आरे वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरत आहेत. झाडे तोडू नये आणि याचा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र यावे, यासाठी जनजागृती करत आहेत. आरे बचाव रॅलीमध्ये साधारण 300 ते 500 पर्यावरणप्रेमी सहभागी झाले.

आरो वाचवा

मुंबई - मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमीं रविवारी मुंबईत रस्त्यावर उतरले. आरे जंगल वाचवाण्यासाठी सरकारचा निषेध केला. शिवाय तेथील झाडे तोडू नये आणि याचा विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक एकत्र यावे, यासाठी जनजागृती करत आहेत. आरे बचाव रॅलीमध्ये साधारण 300 ते 500 पर्यावरणप्रेमी सहभागी झाले.

लोकांचा विरोध मग प्रकल्प कशासाठी?

हेही वाचा - मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडण्याचा प्रस्ताव मंजूर, सत्ताधारी शिवसेनेचा विरोध

आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडसाठी एकूण सत्तावीसशे दोन झाडांची कत्तल करण्यात येणार आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी मुंबईकर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी याला विरोध करत आहे. रविवारी दादर, सीएसटी, अंधेरी या ठिकाणी पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. कार्य हक्क संवर्धन समिती, सेवा वन शक्ती, वन्यप्रेमी शाळेतील युवक, वृद्ध आणि लहान मुले यांनी रस्त्यावर तीव्र निदर्शने केली. तसेच आरेतील झाडे तोडण्यास विरोध दर्शविला. सरकारने लोकांना नको हवा असलेला प्रकल्प जबरदस्ती आपल्या फायद्यासाठी राबवू नये. हेच का तुमचे अच्छे दिन असा प्रश्न विचारत लोक या मोहिमेत सहभागी झालेली आहेत.

हेही वाचा - मेट्रो कारशेडसाठी आरेमधील झाडे तोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा; शिवसेना-काँग्रेसची मागणी

आरे बचाव या आंदोलनात शर्मिला ठाकरे यांनी देखील अचानक या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनकर्त्यांचा मानसिक बाळाला पाठिंबा दिला. याआधीही आरे वाचवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे, शर्मिला ठाकरे तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली होती. पण सरकारकडे बहुमत असल्याने सरकारने नतद्रष्ट निर्णय घेतला, असे त्यांनी म्हटले. आरेच्या या मोहिमेत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे त्यांनी लोकांना सांगितले.

मुंबईचे फुप्फुस समजले जाणारे आरेचे जंगल वाचवण्यासाठी सेव्ह आरे, सेव्ह मुंबई ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. ती मोहीम हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शांत होणार नाही, असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. मेट्रो कारच्याशेडसाठी आरेतील झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे आणि याला मुंबईकरांचा विरोध आहे. मग हा प्रकल्प कोणासाठी असा देखील प्रश्न लोकं विचारत आहेत.

Intro:आरे वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर ;आरे वाचवा मोहिमेत ठाकरेंचा देखील पाठिंबा

मेट्रो रेल्वेच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे. ही झाडे वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी आज मुंबईत रस्त्यावर उतरून आरे वाचवा यासाठी सरकारचा निषेध करत,ती तोडू नये यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येऊन याला विरोध करण्यासाठी जनजागृती करत आहेत . या आरे बचाव रॅली मध्ये साधारण 300 ते 500 पर्यावरण प्रेमी सहभागी झाले आहेत .

आरे कॉलनीतील मेट्रो कार शेड साठी एकूण सत्ताविसशे दोन झाडांची कत्तल करणार आहेत. त्यामुळे पर्यावरण प्रेमी मुंबईकर पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी याला विरोध करण्यासाठी आज दादर ,सीएसटी,अंधेरी या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत. कार्य हक्क संवर्धन समिती, सेवा वन शक्ती, वन्यप्रेमी शाळेतील युवक, वृद्ध आणि लहान मुले यांनी आज रस्त्यावर तीव्र निदर्शने केली व आरेतील झाड तोडण्यास विरोध दर्शविला आहे. त्यामुळे सरकारने लोकांना नको हवा असलेला प्रकल्प जबरदस्ती आपल्या फायद्यासाठी राबवू नये हेच का तुमचे अच्छे दिन असा प्रश्न विचारत आज लोक या मोहीमेत सहभागी झालेली आहेत.

आरे बचाव या या आंदोलनात शर्मिला ठाकरे यांनी देखील अचानक या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनकर्त्यांचा मानसिक बाळाला पाठिंबा दिला. याआधीही आरे वाचवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे शर्मिला ठाकरे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली होती. पण सरकारकडे बहुमत असल्याने सरकारने नतद्रष्ट निर्णय घेतला असे त्यांनी म्हटले.व आरेच्या या मोहिमेत आम्ही तुमच्या सोबत आहोत असे लोकांना सांगितले.

मुंबईचं फुप्फुस समजलं जाणारं आरेचं जंगल वाचवण्यासाठी सेव्ह आरे, सेव्ह मुंबई ही मोहीम सुरू करण्यात आलीय ती मोहीम हा प्रकल्प रद्द केल्याशिवाय शांत होणार नाही असे पर्यावरण प्रेमींनी सांगितले. मेट्रो कारच्या शेडसाठी आरेतील झाडांवर कुऱ्हाड चालवली जाणार आहे आणि याला मुंबईकरांचा विरोध आहे लोकांचा विरोध आहे मग हा प्रकल्प कोणासाठी असा देखील प्रश्न लोकं विचारत आहेत.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.