लोकलच्या ओव्हरहेड वायरमध्ये पेंटाग्राम अडकला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत - मुंबई मध्य रेल्वेची बातमी
मध्य रेल्वेच्या खडवली ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना समोर आली. त्यामुळे मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली असून एकामागे एक लोकल उभ्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले.
मुंबई - मध्य रेल्वेच्या खडवली ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यान दुपारी ३ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास लोकलच्या ओव्हर हेड वायरमध्ये पेंटाग्राफ अडकल्याची घटना समोर आली. त्यामुळे मुंबईकडे येणारी लोकल सेवा विस्कळीत झाली असून एकामागे एक लोकल उभ्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल झाले.
काही लोकल फेर्या रद्द
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वाशिंदमधून सुटलेली लोकल खडवली स्थानकावर येत असताना ओव्हर हेड वायरमध्ये लोकलचा पेंटाग्राफ अडकला होता. त्यामुळे लोकलमधील विद्युत पुरवठा खंडित झालेला होता. घटनेची माहिती मिळताच मध्य रेल्वेचे अभियांत्रीकी पथक घटनास्थळी पोहोचले असून बिघाड दुरुस्तचे काम करत आहेत. मात्र, या घटनेमुळे मागून येणाऱ्या दोन मेल-एक्स्प्रेस गाड्या आणि एक लोकल अडकून पडली आहे. तसेच ३ वाजून २३ मिनिटांची ठाण्यावरून येणारी आसनगांव कल्याण स्थानकात रद्द करण्यात आली. मात्र, या घटनेमुळे लोकलचे बंचिग काढण्यासाठी काही लोकल फेर्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
प्रवाशांचे हाल
खडवली ते वाशिंद रेल्वे स्थानकादरम्यानच्या घटनेमुळे मध्य मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना चागंलाच मनस्तापाला समोर जावे लागले आहे. लोकल सेवा ठप्प झाल्याने मध्य रेल्वे मार्गवरील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढली होती. तसेच अनेक प्रवाशांनी लोकलमधून उतरून पुढचे रेल्वे स्थानकावर रेल्वे रुळावरून पायी जात असल्याचे चित्र दिसून आले. मध्य रेल्वे मार्गावर सततच्या बिघाडामुळे लोकल प्रवाशांनी रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावरच लढणार- नाना पटोले