मुंबई - अभिनेत्री पायल घोष हिने भारतातील मी-टू चळवळ बनावट असल्याचे म्हटले आहे. चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप लावणाऱ्या या अभिनेत्रीने देशात दोन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या चळवळीच्या सत्यतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
"सर्व आरोपींना मी-टू चळवळीत क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे हा आरोप करणाऱ्यांना खोट समजल्या जाते. 'आरोप करणाऱ्यास क्लीनचीट मिळाली असेल तर मग त्यांचा छळ केल्याबद्दल शिक्षा का दिली जात नाही?' सत्य कोठे आहे? त्या महिला कारागृहात का नाहीत? असे अनेक प्रश्न पायलने तिच्या ट्विटर हँडलवरून विचारले आहे.
"ज्या महिला आरोपीच्या समर्थनार्थ पोस्ट करतात त्यांना परिस्थितीबद्दल काहीच माहिती नसते आणि आरोपी असे कधीच करू शकत नाही, असे मत असू शकते. हे म्हणजे बलात्कार करणार्याच्या पत्नीने माझा नवरा निर्दोष आहे आणि तो असे कधीही करू शकत नाही, असे म्हणण्यासारखे आहे, असे तिने वेगळ्या ट्वीटमध्ये लिहिले आहे.
दिग्दर्शक अनुरागची लाय डिटेक्टर, पॉलिग्राफ आणि नार्को टेस्ट करावी, अशी मागणीही पायलने केली आहे. पोलिसांसमोर जबाब नोंदवताना अनुराग खोटे बोलला असल्याचा आरोप पायलने केला आहे. दरम्यान, याप्रकरणी आम्ही पोलीस ठाण्यात विनंती पत्र सादर केले असल्याचे पायलचे वकील नितीन सातपुते यांनी टि्वट करून सांगितले. अनुरागला बॉलीवूडमधील अनेकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर पायलने मी-टू मोहिमेवरून त्याच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत.