ETV Bharat / city

कोरोना व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतलेल्या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीतून वगळा - मुंबई पालिका आयुक्त - प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी

देशभरात कोरोनाची लाट आटोक्यात येत असून लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. ज्यांना लसीचे डोस दिले आहेत अशा नागरिकांकडून कोरोनाचा प्रसार होत नाही, असे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीचे दोन डोस घेऊन मुंबई विमानतळावर भारतातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीतून वगळावे, अशी मागणी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी मुख्य सचिवांकडे केली आहे.

corona vaccine
corona vaccine
author img

By

Published : Jul 13, 2021, 10:13 PM IST

मुंबई - देशभरात कोरोनाची लाट आटोक्यात येत असून लसीकरण मोहीम जोरात सुरू आहे. ज्यांना लसीचे डोस दिले आहेत अशा नागरिकांकडून कोरोनाचा प्रसार होत नाही, असे समोर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर लसीचे दोन डोस घेऊन मुंबई विमानतळावर भारतातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीतून वगळावे, अशी मागणी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे.

आरटीपीसीआर चाचणीतून वगळा -

कोरोनाच्या पहिल्या व दुस-या लाटेत देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना मुंबई विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र दिल्ली, कर्नाटक, गुजरात, गोवा, हैद्राबाद, केरळ आदी ठिकाणी अनेकजण कामानिमित्त जाताना सकाळी जाऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. यावेळी आरटीपीसीआर चाचणी करणे शक्य होत नाही. सध्या देशभरात लसीकरणावर भर देण्यात आला असून अनेकांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत. त्यामुळे अशा देशांतर्गत विमानाने प्रवास करणा-या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीतून वगळण्यात यावे, अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.

या प्रवाशांना चाचणी शक्य नाही -

देशांतर्गत मुंबई ये- जा करणा-या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक आहे. मात्र दिल्ली किंवा इतर ठिकाणी सकाळी जाऊन सायंकाळी किंवा दुसऱ्या दिवशी परतणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचा ४८ तासांत अहवाल मिळवणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत, अशा प्रवाशांना आरटीसीपीसीआर चाचणीशिवाय प्रवास करण्यास सवलत द्यावी, अशी विनंती मुंबई महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारकडे केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.