मुंबई - संपूर्ण देशामध्ये कोरोनाने थैमान घातल्यानंतर देशात मास्क सक्ती करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दुसऱ्या टप्प्यानंतर राज्यात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मास सक्ती उठवण्यात आली होती. आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयात न्या. के. श्रीराम आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर एक सुनावणी सुरू होती. यावेळी एका सुनावणीदरम्यान पक्षकाराचा मोबाईल वाजल्याने आणि तोंडावर मास्क नसल्याने खंडपीठाने पक्षकाराला दोन हजाराचा दंड ठोठावला आहे. ( phone ringing during hearing in Bombay High Court )
खंडपीठाने ठोठावला दंड - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली मास्क सक्ती टप्पाटप्प्याने शिथील करण्यात आली असली तरी उच्च न्यायालयातील कोर्ट रूम नंबर 13 मध्ये मात्र अद्यापही मास्क सक्ती कायम आहे. तोंडाला मास्क असल्याशिवाय कोणालाही कोर्ट रूममध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. मंगळवारी एका पक्षकाराचा मोबाईल फोन वाजला आणि मास्कऐवजी तोडावरील रुमाल खाली आल्याने संतप्त झालेल्या खंडपीठाने पक्षकाराला दोन हजाराचा दंड ठोठावला.
मास्क सक्तीचा फलक कायम - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणुमुळे गेली अडीच वर्ष सर्वत्र मास्क सक्ती करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईत गुडी पाडव्याच्या मुहुर्तावर मास्कची सक्ती उठविण्यात आली. उच्च न्यायालयातही ही सक्ती शिथील करण्यात आली होती. परंतु, उच्च न्यायालयाच्या कोर्ट नंबर 13 मध्ये मास्क सक्ती अद्यापही कायम असून तसा फलकही कोर्ट रूमच्या बाहेर लावण्यात आला आहे.
दोन हजार रुपयांचा केला दंड - या कोर्ट रूममध्ये न्या. के. श्रीराम आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एक पक्षकार आपला मोबाईल शर्टच्या खिश्यात ठेवून बसला होता. त्यावेळी मोबाईल वाजला आणि खंडपीठाचा संताप अनावर झाला. पक्षाकारांने शर्टच्या खिश्यात मोबाईल ठेवून सुनावणीच्यावेळी चित्रीकरण केले असावे असा समजही खंडपीठाचा झाला. खंडपीठाने पक्षकाराला समोर बोलावून चांगलीच कान उघडणी केली. त्यावेळीच पक्षकाराच्या नाकावरील रुमाल घसरल्याने खंडपीठाने संताप व्यक्त करत पक्षकाराला दोन हजाराचा दंड ठोठावत मोबाईल जप्त केला. दंडाची रक्कम भरल्यावर उद्या सायंकाळी 5 वाजल्यानंतर परत देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहे.
हेही वाचा - ED summons Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स