ETV Bharat / city

मुंबईत पारशी नववर्ष उत्साहात साजरे, हे आहेत पारशी समाजाचे मुख्य सण

पारशी वर्षातील शेवटचे दहा दिवस हे पिरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात आणि अखेरच्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते.

मुंबईत पारशी नववर्ष उत्साहात साजरे
author img

By

Published : Aug 17, 2019, 12:54 PM IST

मुंबई - भारतीय संस्कृतीशी पूर्णपणे एकरूप झालेल्या पारशी बांधवांचे आज नववर्ष. हे नववर्ष ‘पतेती’ या नावानेही ओळके जाते. अत्यंत शांततेने जगणारा आणि असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा समाज म्हणून पारशी समाजाची ओळख आहे. या धर्मात फारसे सण-उत्सव नाहीत. पतेती, नवरोज आणि जमशेद नवरोज हे त्यांचे मुख्य सण.

पारशी वर्षातील शेवटचे दहा दिवस हे पिरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात आणि अखेरच्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते. यानिमित्ताने मुंबईत आज पारशी धार्मिक स्थळांवर पारशी बांधवांची ये-जा सुरू आहे. येथे प्रार्थना करत लोक एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

मुंबईत पारशी नववर्ष उत्साहात साजरे, हे आहेत पारशी समाजाचे मुख्य सण

पतेती हा पारशी धर्मियांच्या नववर्षाचा पहिला दिवस! आपल्या देशात पारशी धर्मियांची संख्या अत्यल्प असली तरी सर्वच क्षेत्रांमधील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

१९ व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा पारशी लोक मुंबईत आले तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होते. नंतर हळूहळू आपल्या खाद्यसंस्कृतीने त्यांनी या शहराला भुरळ घातली. मुंबईसह देशातील अनेक शहरांत पारशी हॉटेल्सची लोकप्रियता प्रचंड आहे. मुंबईतील नाक्या- नाक्यांवर इमारतींच्या कोपऱ्याच्या गाळ्यांत ही पारशी हॉटेल्स गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ स्वतःचे एक वेगळेपण जपत आहेत. या पारशी हॉटेल्सना इराणी हॉटेल्स किंवा इराणी कॅफेज असेही म्हणतात. असे हे पारसी लोकं देशाचा एक भाग आहेत.

आपल्याकडे जशी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणात पारशी धर्मात पतेतीचं महत्त्व आहे. या दिवशी सगळे पारशी कुटुंबं नवीन कपड्यांची खरेदी करतात. घरात गोडधोड पदार्थांची मेजवानी असते. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर, रव्याचा शिरा, दह्यापासून बनवले जाणारे गोड पदार्थ, अशी रेलचेल प्रत्येक घरात असते. दिवाळीत आपण जसे एकमेकांना मिठाई देतो, तसेच पारशी लोक एकमेकांना आणि इतर धर्मातील मित्रांनाही मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करतात. असेच चित्र आज मुंबईत दिसत आहे.

Intro:
मुंबईत पारसी लोकांचे नववर्ष म्हणजेच पतेती उत्साहात साजरी होत आहे.

भारतीय संस्कृतीत साखरेप्रमाणं विरघळून जाऊन इथल्या संस्कृतीशी एकरूप झालेल्या पारशी धर्मीयांचा आज ‘पतेती’ हा उत्सव आहे. अत्यंत शांततेनं जगणारा आणि असेल त्या परिस्थितीशी जुळवून घेणारा समाज ही पारशी समाजाची ओळख आहे. या धर्मात फारसे सण-उत्सव नाहीत. पण पतेती, नवरोज व जमशेद नवरोज हे त्यांचे वर्षभरातील प्रमुख सण. पारशी वर्षातील शेवटचे दहा दिवस हे पिरांच्या शांतीचे दिवस म्हणून साजरे केले जातात आणि अखेरच्या दिवशी ‘पतेती’ हा सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते .त्यानिमित्ताने मुंबईत आज पारसी धार्मिक ठिकाणी त्या लोकांची येजा होत आहे आणि पार्थना करत लोक एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

पतेती हा पारशी धर्मियांच्या वर्षाचा शेवटचा दिवस ! आपल्या देशात पारशी धर्मियांची संख्या अत्यल्प असली तरी सर्वच क्षेत्रांमधील त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. एक अलिप्त, शांत आणि निरुपद्रवी समाज म्हणून पारसी समाज ओळखला जातो.आज याच समाजाचा पवित्र असा पतेती सण म्हणजेच नववर्ष उत्साहात साजरा होत आहे.

१९व्या शतकाच्या प्रारंभी जेव्हा हे इराणी-पारशी लोक मुंबईत आले होते तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होते. नंतर हळूहळू आपल्या खाद्यसंस्कृतीने त्यांनी ह्या शहराला भुरळ पाडली. मुंबईसह देशातील अनेक शहरांत पारशी हॉटेल्सची लोकप्रियता प्रचंड आहे. मुंबईतील नाक्या- नाक्यांवर इमारतींच्या कोपऱ्याच्या गाळ्यांत ही पारशी हॉटेल्स गेल्या १०० वर्षांहून अधिक काळ स्वतःचे एक वेगळेपण जपत आहेत. या पारशी हॉटेल्सना इराणी हॉटेल्स किंवा इराणी कॅफेज असेही म्हणतात. असे हे पारसी लोकं देशाचा एक भाग आहेत.

आपल्याकडे जशी दिवाळी उत्साहात साजरी केली जाते त्याच प्रमाणात पारशी धर्मात पतेतीचं महत्त्व आहे. या दिवशी सगळी पारशी कुटुंबं नवीन कपडयांची खरेदी करतात. घरात गोडधोड पदार्थाची मेजवानी असते. मित्र-नातेवाईक यांना आमंत्रित करून त्यांच्यासोबत या पक्वान्नांचा आस्वाद घेतला जातो. त्यात गोड खीर, गव्हाच्या सुजीचा (रव्याचा) शिरा, दह्यापासून बनविले जाणारे गोड पदार्थ अशी रेलचेल प्रत्येक घरात असते. दिवाळीत जसं आपण एकमेकांना मिठाई देतो, तसंच पारशी लोक एकमेकांना आणि इतर धर्मातील मित्रांनाही मिठाई वाटून सणाचा आनंद साजरा करतात.असेच चित्र आज मुंबईत दिसत आहे पतेती मोठ्या उत्साहात शांतीने पारसी लोकं साजरी करत आहेत.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.