ETV Bharat / city

School Admission : मुंबई पालिकेच्या सीबीएसई, आयसीएसई शाळांना भरघोस प्रतिसाद, आणखी ९६० विद्यार्थ्यांना मिळणार ऍडमिशन

author img

By

Published : Mar 30, 2022, 5:20 PM IST

मुंबई पालिकेने (BMC School) इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या १२ शाळांमध्ये ज्युनियर केजी आणि नर्सरी या वर्गाच्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता दिली आहे.

school
शाळा फाईल फोटो

मुंबई - मुंबई महापालिकेने (BMC) आपोया शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. या शाळांना पालकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या १२ शाळांमध्ये ज्युनियर केजी आणि नर्सरी या वर्गाच्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता दिली आहे. यामुळे ९६० जागा उपलब्ध झाल्या असून १० एप्रिलपर्यंत पालकांना ऍडमिशन घेता येणार असल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाने दिली.

शाळांचा दर्जा सुधारला - मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खराब असल्याची टीका नेहमी केली जात होती. शिक्षणाचा दर्जा खराब असल्याने विद्यार्थी संख्या घटत होती. पालक आपल्या मुलांना पालिका शाळांऐवजी खासगी शाळांमध्ये शिकवणे पसंद करू लागले. यामुळे पालिका शाळा ओस पडू लागल्या होत्या. पालिका शाळांना पुन्हा चांगले दिवस यावेत म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या. शिवसेना युवा नेते व राज्याचे आताचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून सीबीएसई, आयसीएसई तसेच आयबी बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पालिका शाळांमध्ये आपल्या मुलांना एडमिशन मिळावे यासाठी पालक रांगा लावू लागले आहेत. पालिकेने इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळणे शक्य झाले आहे.

९६० जागा वाढवल्या - पालिकेने इंग्रजी, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू केल्या आहेत. यामुळे आपल्या पाल्याना मोफत आणि इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने पालिकेच्या शाळांबाहेर एडमिशनला रांगा लागलेल्या असतात. आता सीबीएसई, आयसीएसई शाळांना पालकांकडून पसंती दिली जात असल्याने १२ शाळांमधील ज्युनिअर केजी तसेच नर्सरी वर्गाच्या तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. १२ शाळांमध्ये ज्युनिअर केजीच्या १२ तर नर्सरीच्या १२ तुकड्या वाढवण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये ४० विद्यार्थी असणार आहेत. यामुळे नव्याने ९६० जागा उपलब्ध झाल्या आहेत. या जागांसाठी २८ ते १० एप्रिलपर्यंत एडमिशन घेता येणार आहे अशी माहिती शिक्षण विभागातील अधिकारी असलेल्या राजू तडवी यांनी दिली आहे.

या ठिकाणी मिळणार ऍडमिशन - सायन प्रतीक्षा नगर पालिका शाळा, दिंडोशी पालिका शाळा, भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणे नगर पालिका शाळा, मालाड जनकल्याण पालिका शाळा, कुर्ला तुंगा व्हिलेज शाळा, विद्याविहार राजावाडी पालिका शाळा, चेंबूर अझीझबाग पालिका शाळा, विक्रोळी हरियाली व्हिलेज पालिका शाळा, मुलुंड मिठागर पालिका शाळा या ठिकाणी गरीब व गरजू विद्यार्थ्यांना सीबीएसई, आयसीएसई बोर्डाचे शिक्षण घेता येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.