मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांना मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात फरार घोषित केले होते. परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी हा अर्ज रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज न्यायालयाकडून सुनावणी घेतली जाणार आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर गोरेगाव पोलीस स्थानकात खंडणी प्रकरणातच्या तपासाकरिता कांदिवली युनिट 11 समोर त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा संदर्भात न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. परमबीर सिंग यांच्या वकिलांकडून शुक्रवार (दि 27) मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात फरार घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा याकरिता अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर आज सोमवार (दि.29) रोजी सुनावणी होणार आहे. आज परमवीर सिंग यांना न्यायालयाकडून दिलासा मिळणार का यावर आज निर्णय देणार आहे.
काय आहे प्रकरण?
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोपांवरून परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलिस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता. त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्यासह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे.
Parambir Singh : फरार आदेशाविरोधातील परमबीर सिंगांच्या याचिकेवर आज सुनावणी - parambir singh absconding
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग(Parambir Singh) यांना मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात फरार घोषित केले होते. परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी हा अर्ज रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी अर्ज केला होता. त्या अर्जावर आज न्यायालयाकडून सुनावणी घेतली जाणार आहे.