ETV Bharat / city

धक्कादायक.. अँटिलिया प्रकरणी तपासाची दिशाभूल करण्यासाठी परमबीर सिंगानी सायबर तज्ज्ञाला दिली ५ लाखांची लाच

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) दाखल केलेल्या एका चार्जशीटमध्ये एजन्सीमधील एका सायबर एक्सपर्टने धक्कादायक माहिती दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया प्रकरणाची दिशाभूल करण्यासाठी जैश उल हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेशी संबंधिक अहवालात छेडछाड करण्यासाठी सायबर एक्सपर्टला पाच लाखांची लाच दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Parambir Singh
Parambir Singh
author img

By

Published : Sep 8, 2021, 3:32 PM IST

मुंबई - अँटिलिया स्फोटक प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रात एका सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अँटिलिया घटनेच्या तपासाची दिशाभूल करण्यासाठी जैश-उल-हिंद या दहशतवादी संघटनेशी संबंधित अहवालाशी छेडछाड केली होती. यासाठी, परमबीरने त्या सायबर तज्ञाला 5 लाख रुपयांची लाच दिली होती.

सायबर तज्ञाने एनआयएला दिलेल्या आपल्या जबाबात मोठा खुलासा केला आहे. त्यामुळेच एनआयएने त्याचाही जबाब आरोपपत्रात नोंदवलेला आहे. ज्यामध्ये सायबर तज्ज्ञाने सांगितले की, अँटिलिया घटनेनंतर 'जैश-उल-हिंद' या दहशतवादी संघटनेने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. असे त्यांना त्यांच्या अहवालात लिहिण्यास सांगितले होते. त्यासाठी दिल्लीत इस्रायल दूतावासासमोर स्फोट झाल्यानंतर टेलिग्राम चॅनेलचा वापर करण्यात आला.

जैश-उल-हिंदच्या षडयंत्रात परबीर सिंग याचा सहभागाचा संशय -

अँटिलिया घटनेनंतर समोर आलेल्या जैश-उल-हिंदच्या षडयंत्रात परबीर सिंग याचा सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणांना अगदी सुरुवातीपासूनच होता. मात्र एनआयएने आपल्या आरोपपत्रात परमबीर सिंगच्या भूमिकेबद्दल काहीही लिहिले नसले तरी, सायबर तज्ज्ञाने आपल्या जबाबामध्ये परमबीर यांचे नाव घेतले आहे. तसेच त्याने परमबीर यांच्या सांगण्यावरून अहवालात काही बदल केले आहेत. हा तोच रिपोर्ट आहे जो जानेवारी 2021 मध्ये दिल्लीतील इस्रायल दूतावासासमोर झालेल्या बॉम्बस्फोटानंतर बनवण्यात आला होता. त्यावेळीही जैश-उल-हिंद नावाच्या दहशतवादी संघटनेने ही जबाबदारी टेलिग्रामवर स्विकारली आणि त्यानंतर सायबर तज्ञांनी अहवाल तयार केला होता.

हे ही वाचा - 'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ

एनआयएकडून सायबर तज्ज्ञाचा जबाब -

एनआयएने 5 ऑगस्ट रोजी या सायबर तज्ज्ञाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले होते. ज्यामध्ये त्याने म्हटले होते की, तो भारतातील अनेक आयपीएस अधिकाऱ्यांना सायबरशी संबंधित प्रशिक्षण देतो. अनेक गुप्तचर संस्थांसोबत काम ही करतो. त्यानुसार 9 मार्च 2021 रोजी तो मुंबईत असताना ट्रेनिंग संदर्भात बातचीत करण्यासाठी परमबीर सिंग यांना त्या़च्या कार्यालयात भेटायला गेला होता. त्या बैठकीच्या वेळी परमबीर सिंग यांना सांगितले होते की, 2 फेब्रुवारी रोजी अँटिलिया घटनेची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट "जैश-उल-हिंद" या टेलिग्राम चॅनेलवर अपलोड करण्यात आली होती. त्याचा छडा लावण्यात स्पेशल सेल दिल्ली यांना यश आलेले आहे. ही पोस्ट दिल्लीच्या तिहार जेल परिसरातून करण्यात आली होती असे सांगितले.

तसेच या घटनेनंतर सायबर तज्ञ म्हणून तोही अशाच एका टेलिग्राम चँनेलला फॉलो करत असल्याचे परमबीर सिंह यांना त्याने सांगितले. त्यानंतर परमबीर यांनी त्या सायबर तज्ञाला असाच अहवाल या प्रकरणासाठी देण्याबाबत गळ घातली. हा अहवाल गोपनीय आहे. हे सांगून सुद्धा परमबीर सिंग यांनी असा अहवाल देण्यासंदर्भात थेट एनआयए आयजीशी बोलणार असल्याचेही सागितले.

हे ही वाचा - कपडे वाळत घालताना आठव्या मजल्यावरून पडल्याने महिलेचा मृत्यू

परमबीर सिंग यांच्याकडूनही अहवालासाठी गळ -

परमबीर सिंग याच्या आग्रहानंतर सायबर तज्ञाने अँटिलिया स्फोटकाची जबाबदारी घेणारा जैश उल हिंद संघटनेचा अहवाल बनवला. हा अहवाल बनवून परमबीर सिंग यांना दाखवला असता. त्यांनी जैश उल हिंदचे पोस्टरही त्यात जोडण्यास सांगितले. तसेच एनआयएचे आयजी केव्हाही मुंबईत येतील. त्यांना हा अहवाल त्यांना दाखवावा लागेल, त्यामुळे सायबर तज्ञावर परमबीर सिंह यानी दबाव टाकला. अहवालात बदल केल्यानंतर सायबर तज्ञांनी अहवालात ते जैश उल हिंदचे पोस्टर जोडून ते परमबीरच्या अधिकृत मेलवर पाठवले.

या कामानंतर खूश होऊन परमबीर सिंहने सायबर तज्ञाला पैशाची विचारणा केली. तसेच खासगी स्वीय सहाय्यकास बोलावले आणि पैशांची ऑफर केली. सायबर तज्ञ विरोध करत असतानाही, परमबीरने सुरूवातीला ३ लाख सायबर तज्ञास देण्यास सांगितले. मात्र स्वीय सहाय्यक केबिन बाहेर पडत असताना, त्याला पून्हा थांबवून सायबर तज्ञाला ५ लाख देण्यास सांगितले. त्यावर सायबर तज्ञाने ऐवढे पैसे जास्त असल्याचे सांगितले असता. परमबीर सिंगने यांनी काही ऐकले नाही.

दरम्यान एनआएने सायबर तज्ञाला या रिपोर्ट संदर्भात चर्चा करण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी अहवालात दिलेल्या माहितीनुसार २६ फेब्रूवारीपासून आपण जैशच्या या चॅनेलच्या मागे होतात. मात्र धमकीचा मेसेज हा २७ फेब्रुवारीला आलेला आहे. मग एकदिवस आधीच आपण त्यावर कसे काम करत होतात यावर एनआयएने सायबर तज्ञ अधिकार्याला प्रश्न केला असता. त्यावर सायबर तज्ञाने हे टेलिग्राम अकाऊट फक्त ४ जण फॉलो करत होते. चॅनेल आणि अँटिलिया घोटाळ्यानंतर जबाबदारी घेणारे चॅनेल सारखे नाहीत दोन्ही वेगळे असल्याचे सांगितले.

दरम्यान नुकतीच या प्रकरणात एनआयएच्या हाती काही महत्वाचे पुरावे लागले आहेत. याच पुराव्याच्या आधारावर त्यांना सचिन वाजे आणि सुनिल माने या़ची चौकशी करायची होती. न्यायालयात तशी मागणीच एनआयएने केली. कारण सचिन वाजेची 28 दिवस कस्टडी एनआयएनं घेतली आहे. 2 दिवस कस्टडी बाकी होती. तर अटकेनंतर सुनील माने 14 दिवस कस्टडीत होता. त्यामुळे त्याची 4 दिवसाची कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने वाजेच्या तब्येतीच्या कारणास्तव ती फेटाळून लावली. एनआयए सूत्राकंडून मिळालेल्या महितीनुसार या संपूर्ण कटा मागे मुख्य सूत्रधाराचे काही पुरावे एनआएच्या हाती लागलेले आहे. ओळख पटवण्यासाठीच एनआयएला या दोघा़ंची कस्टडी हवी होती. आता या कटामागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.