ETV Bharat / city

Param Bir Singh Extortion Case : सर्वोच्च न्यायालयाचा मला आदर; परमबीर सिंग यांची प्रतिक्रिया - Antilia Blast Case

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप लावल्यानंतर तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणानंतर ते दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील गोरेगाव येथील प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी कांदिवली गुन्हे शाखेच्या कार्यालयात गेले. त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली.

Param Bir Singh
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग
author img

By

Published : Nov 26, 2021, 7:29 AM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मी आज तपासासाठी हजर झालो आहे. सर्वोच्च न्यायालयाचा ( Param Bir Singh ) मला आदर आहे. जसा कोर्टाचा आदेश आहे त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया परमबीर सिंह ( Former Mumbai Police Commissioner Param Bir Singh ) यांनी दिली आहे. याशिवाय आपल्याला काही बोलायचं नसल्याचंही सिंह म्हणाले.

सात तास चौकशी -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Former Home Minister Anil Deshmukh ) यांच्यावर आरोप लावल्यानंतर तब्बल 231 दिवसानंतर मुंबईत दाखल झाले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या संरक्षणानंतर ते दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणातील ( Extortion Case ) गोरेगाव येथील प्रकरणासंदर्भात चौकशीसाठी कांदिवली गुन्हे शाखेच्या ( Kandivali Crime Branch ) कार्यालयात गेले. त्यांची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली. चौकशीला परमबीर सिंग यांनी पूर्ण सहकार्य केले असल्याची प्रतिक्रिया देखील परमबीर सिंग यांच्या वकिलांनी दिली आहे.

कोर्टाची तंबी -

कोर्टाने फरार म्हणून घोषित केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह समोर आले आहेत. त्यांनी कांदिवली गुन्हे शाखा युनिट 11 च्या कार्यालयात आज हजेरी लावली. यावेळी त्यांची गोरेगावातील वसुली प्रकरणाविषयी चौकशी करण्यात आली. तब्बल 7 तास चाललेल्या चौकशीनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला. अनेकवेळा चौकशीसाठी समन्स पाठवल्यानंतरही हजर न झाल्यामुळे मुंबई पोलिसांनी ( Mumbai Police ) सिंह यांना फरार म्हणून घोषित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर किला कोर्टाने सिंह यांना फरार घोषित केले ( declared absconding ) होते. तसेच आगामी 30 दिवसांच्या आत हजर न झाल्यास संपत्ती जप्ती करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील कोर्टाने दिली होती. त्यानंतर आता सिंह मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर झाले.

सिंह यांच्यावर आरोप काय -

अँटिलिया स्फोटके ( Antilia Blast Case ) आणि मनसुख हिरेन हत्याकांडानंतर ( Mansukh Hiren Murder Case ) परमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे लक्ष्य ठेवल्याचा आरोप करीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्याविरोधातही तक्रारी येऊ लागल्या. मुंबई आणि इतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. यानंतर अटकेच्या भीतीने आजारी असल्याचे कारण दाखवत मे महिन्यात ते सुटीवर गेले होते. चौकशीसाठी समन्स पाठवूनदेखील ते हजर राहत नव्हते. तपास यंत्रणांच्या रडारवरूनही ते दिसेनासे झाल्याने न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. अखेर काल तब्बल सात महिन्यानंतर ते रेंजमध्ये आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.