नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न उद्धभवत आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्याने दिल्लीतून तिघे नोकरीसाठी केरळमध्ये गेले होते. परंतु ती नोकरीही गेल्याने केरळ मधील मोबाईलचे दुकान फोडून त्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटला आहे. या टोळीला पनवेल आर.पी.एफने गजाआड केले आहे.
लॉकडाऊनमुळे रोजगार मिळत नसल्याने दिल्लीतून तिघे गेले होते केरळमध्ये
लॉकडाऊनमुळे कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नसल्याने दिल्लीत राहणारे तिघे, नोकरीसाठी केरळला गेले. तेथे त्यांना एका हॉटेलमध्ये कूक म्हणून नोकरी मिळाली. मात्र त्यादरम्यान, संबंधित हॉटेल देखील कोरोनाच्या प्रसारामुळे बंद झाले. हॉटेल बंद झाल्याने तिघांना पोटापाण्याचा प्रश्न सतावू लागला.
उद्योग नसल्याने मोबाईल शॉप फोडण्याची बनविली योजना
हॉटेल बंद झाल्यावर पोटापाण्याचा प्रश्न या तिघांना सतावू लागला होता. त्यातच त्यांनी, हॉटेलजवळील मोबाईल शॉपमधून मोबाईल चोरी करण्याची योजना बनवली. या योजनेनूसार त्यांनी अनेक ब्रॅण्डेड कंपन्यांचे मोबाईल चोरले.
चोरीचे मोबाईल मुंबईत विक्री करणार होते
हे चोरीचे मोबाईल तीन बॅगमध्ये आणून त्यांची मुंबईत विक्री करणार होते. मात्र घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. हे तिघे केरळहून मुंबईत रवाना होत असताना, आर.पी.एफ. रेल्वे पोलीस या चोरट्यांवर नजर ठेवून होते. हे चोर पनवेलला येताच आर.पी.एफ. रेल्वे पोलिसांनी तिघांना सापळा रचून गजाआड केले.
हेही वाचा - चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात भीषण आग; कोळसा वाहून नेणारे कन्व्हेअर बेल्ट जळाले