ETV Bharat / city

भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर - BJP's defeated candidates meeting pankaja munde absent

भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक.. पराभूत उमेदवार असूनही पंकजा मुंडे बैठकीला गैरहजर..

भाजपच्या पराभूत उमेदवारांच्या बैठकीला पंकजा मुंडे गैरहजर
author img

By

Published : Nov 16, 2019, 5:42 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाची आज शुक्रवारी दादर येथील भाजप पक्ष कार्यालयात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक होत आहे. पराभूत झालेल्या भाजपच्या 59 उमेदवारांच्या या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील मार्गदर्शन करणार आहेत. मात्र, पराभूत उमेदवार असूनही पंकजा मुंडे या बैठकीला गैरहजर असल्याने, त्यांची नाराजगी अद्यापही दूर झाली नसल्याचे बोलले जात आहे.

भाजपच्या पराभूत उमेदवारांची बैठक, पंकजा मुंडे गैरहजर

हेही वाचा... जनरेटर खरेदीसाठी रत्नागिरी नगरपालिकेला मिळणार २ कोटी; पाण्याची समस्या सुटणार

भाजपच्या पराभूत झालेल्या उमेदवारात रोहिनी खडसे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, वैभव पिचड यांसह इतर उमेदवार उपस्थित होते. मात्र बैठकीला सुरवात झाली, तरीही पराभूत उमेदवार माजी महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे मात्र गैरहजर होत्या. त्यांच्या गैरहजेरीमुळे मुंडे यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये होत आहे. पंकजा मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला आहे.

हेही वाचा... अमरावतीच्या शिरजगावात पारंपरिक त्रिजटा उत्सव संपन्न, हजारो भाविकांची उपस्थिती

Intro:मुंबई

भारतीय जनता पक्ष आज दादर येथील भाजपच्या पक्ष कार्यलयात विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक घेत आहे. या बैठकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे हे उपस्थित आहेत. तर पराभूत झालेल्या उमेदवारात रोहिनी खडसे, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, माजी मंत्री अनिल बोंडे, राम शिंदे, राजकुमार बडोले, वैभव पिचड सह इतर उमेदवार उपस्थित होते. या बैठकीला सुरवात झाली असली तरी अद्याप विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या महिला व बालकल्याण विकास मंत्री पंकजा मुंडे गैर हजर आहेत. पंकजा मुंडे या भाजपच्या मोठ्या नेत्या समजल्या जातात. त्यांच्या गैरहजेरी मुळे मुंडे यांची नाराजी दूर झाली नसल्याची चर्चा दबक्या आवाजात कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.