मुंबई - कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला होता. आता जरी संख्या नियंत्रणात असली तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. यामुळे भविष्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू नये, यासाठी मुंबईतील हिरानंदिनी रुग्णालयात हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा पहिला प्रकल्प बसवण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
ऑक्सिजन प्रकल्पाचे वैशिष्ट्ये
काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्णसंख्या वाढली होती. यामुळे आरोग्य यंत्रणेवर देखील ताण वाढला होता. ऑक्सिजनची कमतरता भासू लागल्याने रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पवई येथील हिरानंदानी रुग्णालयाने पहिले हवेतून ऑक्सिजन तयार करणारा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्धाटन करण्यात आले. या ऑक्सिजन प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे आजूबाजूला असणारी ताजी हवा आत खेचण्यात येते. मग टप्प्याटप्पाने प्रक्रिया करून ऑक्सिजन वेगळे केले जाते. त्यानंतर हा ऑक्सिजन रुग्णालयात पोहोचवला जातो.
ऑक्सिजन प्रकल्पाचा वापर कसा होणार?
या ऑक्सिजन प्रकल्पाचा विचार केला तर दिवसाला 10 लाख लिटर ऑक्सिजन निर्मिती या प्लांटमधून करता येऊ शकते. या प्रकल्पासाठी 70 ते 80 लाख खर्च आला आहे. लिक्विड ऑक्सिजनपेक्षा या प्रकल्पामध्ये वेगाने ऑक्सिजन निर्मिती होते. सुरुवात हवेतील ऑक्सिजन हा कॉम्फ्रेश मशीनमध्ये खेचून घेतला जातो. मग पुढे ही हवा फिल्टर करून त्याला तेलजन्य पदार्थ वेगळे केला जातो. मग यातून हवेतून ऑक्सिजन वेगळा करून प्रेशर केला जातो. नंतर तो रुग्णालयात रुग्णासाठी पाठवला जातो.
हेही वाचा - आता चीनमध्ये ''हम दो हमारे तीन'', सरकारने दिली कुटुंब नियोजनात ढील