ETV Bharat / city

बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न - महापौर किशोरी पेडणेकर - Our attempt is for the smooth immersion of Bappa

मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुरूवारी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. पुण्यात निर्बंध कडक झाले की तिथे काही बोलणार नाही. इकडे मात्र लगेच ओरडणार असा टोला महापौरांनी विरोधकांना लगावला.

mumbai
महापौरांनी कामाचा घेतला
author img

By

Published : Sep 9, 2021, 7:38 PM IST

मुंबई - नागपूर खंडपीठाने नैसर्गिक ठिकाणी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करू नये असे आदेश दिले आहेत. या आदेशांचे पालन केले जाईल. बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी मुंबईमधील विसर्जन स्थळांची संख्या वाढवण्यात येईल. सोसायट्यांमध्ये विसर्जनाची व्यवस्था केली जाईल. अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर पेडणेकर यांनी केले आहे.

महापौर किशोरी पेडणेकर

निर्विघ्न विसर्जन व्हावं करण्याचा प्रयत्न
मुंबईतील प्रमुख गणेश विसर्जन स्थळांची मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी गुरूवारी पाहणी करून तयारी कामांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना महापौर बोलत होत्या. मुंबईत निर्बंध कडक केल्यास, बाकीचे कडक होतात. पुण्यात निर्बंध कडक झाले की तिथे काही बोलणार नाही. इकडे मात्र लगेच ओरडणार असा टोला महापौरांनी विरोधकांना लगावला. नागपूर खंडपीठाने दिलेल्या गाईडलाईनचे पालन केले जाईल. पालिका प्रशासनाचे कर्मचारी विसर्जनासाठी येणाऱ्या मूर्ती चौपाटीबाहेरच विसर्जीत करतील. त्यासाठी महापालिकेची तयारी पूर्ण आहे. बाप्पाबद्दलच्या संवेदना दुखावल्या जाणार नाही याची काळजी घेऊ. गणेश विसर्जनाला मुंबईकर आले तर निर्विघ्न विसर्जन व्हावं हाच प्रयत्न असल्याचे महापौरांनी सांगितले. विसर्जनावेळी नागरिक गर्दी करू नयेत यासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे. ५०० मीटरच्या अंतरावर तलाव असतील असा प्रयत्न करणार आहोत. गर्दी होऊ नये म्हणून सोसायट्यांमध्येही विसर्जनाची ववस्था केली जाईल असे महापौरांनी सांगितले.

mumbai
बाप्पाचे निर्विघ्न विसर्जन व्हावं
लहान मुलांची काळजी घ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना बाहेर पाठवू नका. मास्क वापरायला लहान मुलांनाही आवडत नाही. पालिका काळजी घेत आहे, पालकांनीही लहान मुलांची काळजी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले आहे.पालिका सज्जकोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असून बृहन्मुंबई महानगरपालिकेने निर्धारित केलेल्या नियमांचे तसेच त्रिसूत्रीचे पालन करून गणेशोत्सव साजरा करायचा आहे. ठिकठिकाणी कृत्रिम तलावाची तसेच फिरत्या कृत्रिम तलावांची निर्मिती केली आहे. कृत्रिम तलावांमध्ये जास्त विसर्जन करण्यावर नागरिकांनी भर द्यावा, असे आवाहनही महापौरांनी गणेशभक्तांना केले आहे. त्यासोबतच नैसर्गिक चौपाट्या ज्यांच्या घराजवळ आहे त्या मंडळाने तसेच गणेश भक्तांनी महापालिकेच्या नियमाप्रमाणे आपली गणेश मूर्ती महापालिका कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करावी. आपला विसर्जनाचा पाट तसेच वाळू आपल्याला त्वरित देण्यात येईल. जेणेकरून विसर्जनस्थळ आपल्याला पटकन मोकळे करता येईल, असेही महापौरांनी प्रतिपादन केले. गिरगाव चौपाटी येथे दीडशे टेबलची गणेश मूर्ती स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.विसर्जनासाठी विभाग कार्यालयात नोंदणी गिरगाव चौपाटी पासून महापौरांनी पाहणीला प्रारंभ केला. त्यानंतर दादर चौपाटी, माहीम चौपाटी याठिकाणी महापौरांनी भेट देऊन तेथील तयारी कामांचा संबंधित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. गिरगाव चौपाटी येथे ज्याप्रमाणे विसर्जनासाठी संबंधित मंडळाने विभाग कार्यालयात नोंदणी केल्यानंतर विभाग कार्यालयाकडून जी वेळ मिळेल त्या वेळेत मंडळाने विसर्जन करावे. त्याप्रमाणे इतर चौपाट्यांवरही व्यवस्था करण्याचे निर्देश महापौरांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या आवाहनाला मुंबईकर निश्चितच प्रतिसाद देतील,असा आशावाद महापौरांनी यावेळी व्यक्त केला.हेही वाचा - राहुल गांधी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर; माता वैष्णवी देवीचे घेणार दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.