ETV Bharat / city

'त्या' शाळेंचे ऑडिट होणार- बच्चू कडू

author img

By

Published : Jan 20, 2021, 10:54 PM IST

कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात राज्यातील ज्या शाळांनी पालकांकडून चुकीच्या पद्धतीने फी घेतली, अशा शाळांकडून फीचे पैसे परत घेऊन ते पालकांना दिले जातील. असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

बच्चू कडू
बच्चू कडू

मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात राज्यातील ज्या शाळांनी पालकांकडून चुकीच्या पद्धतीने फी घेतली, अशा शाळांकडून फीचे पैसे परत घेऊन ते पालकांना दिले जातील. असं शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी म्हटले आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते.

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शाळांकडून वसूल करण्यात आलेल्या फी संदर्भात चर्चा झाली. त्यावर सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे. मात्र ज्या शाळांनी कोरोना आणि त्यानंतरच्या काळात चुकीच्या पद्धतीने पालकांकडून फी वसूल केली अशा शाळांचे ऑडिट केले जाईल, आणि या शाळांकडून पालकांना त्यांनी भरलेली फी वसूल करून दिली जाईल. पालकांकडू चुकीच्या पद्धतीने वसूल करण्यात आलेल्या फीच्या संदर्भात आपण 15 शाळांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले असून, अशाच प्रकारे राज्यातील इतर शाळांचे देखील ऑडिट होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत पुढील बैठकीत निर्णय

राज्यात कोरोना प्रादुर्भाव कमी होत असून, दहावी आणि बारावीच्या परीक्षा या चांगल्या पद्धतीने घेण्यात येतील. परीक्षांबाबतचे निर्णय स्थानिक स्थरावर घेऊन, त्याची माहिती सरकारला देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दहावी- बारावीच्या परीक्षा नेमक्या कोणत्या पद्धतीने घ्यायच्या यावर मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत निर्णय होणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.