ETV Bharat / city

Sharad Pawar Meeting : 21 जूनला शरद पवारांनी बोलावली विरोधी पक्षाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी 21 जूनला विरोधी पक्षांची बैठक ( Meeting of the Opposition ) बोलाविली आहे. देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीची ( Presidential election ) जोरदार चर्चा आहे. भाजपेतर विरोधी पक्षांचा एकच उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी असावा म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दृष्टीने शरद पवार यांनी ही बैठक बोलाविली आहे.

Sharad pawar
शरद पवार
author img

By

Published : Jun 18, 2022, 3:59 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) ज्येष्ठे नेते शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी 21 जूनला विरोधी पक्षांची बैठक ( Meeting of the Opposition ) बोलाविली आहे. देशात सध्या राष्ट्रपती निवडणुकीची ( Presidential election ) जोरदार चर्चा आहे. भाजपेतर विरोधी पक्षांचा एकच उमेदवार राष्ट्रपती निवडणुकीसाठी असावा म्हणून विरोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच दृष्टीने शरद पवार यांनी ही बैठक बोलाविली आहे.

विरोधकांमध्ये समन्वयाचा अभाव - राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि विरोधी पक्षांमध्ये थेट स्पर्धा असणार आहे. भाजपाकडे 50 टक्क्यांच्या जवळपास मते आहेत. त्यामुळे भाजपा उभा करणार असलेल्या उमेदवाराविरोधात विजयी होण्यासाठी सर्व विरोधी पक्षांकडून सार्वमताने एकच उमेदवार उभा केला जाणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास भाजपा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभा करेल त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. अशा परिस्थितीत विरोधकांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. तथापि, त्याचाच अभाव दिसून येत आहे. काँग्रेसने विरोधकांच्या एकजुटीसाठी बैठक बोलाविली होती. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे 15 जूनला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपली वेगळी बैठक बोलाविली होती. त्यामुळे विरोधकांत सध्यातरी एकमत नसल्याचे चित्र आहे.

शरद पवार काय भूमिका घेणार - विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी आहेत. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून आपण उभे राहणार नाही हे त्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. तर एका बैठकीत शिवसेनेने सर्व विरोधकांनी शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून एकमताने उभे करावे अशी भूमिका जाहीर केली आहे. मात्र सर्व विरोधकांमध्ये सध्या तरी एकमत असल्याचे दिसत नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी बोलाविलेली 21 जूनची बैठक महत्त्वाची असणार आहे. या बैठकीत शरद पवार विरोधकांना कोणता कानमंत्र देणार यावर या निवडणुकीची पुढची दिशा ठरू शकते.

हेही वाचा - कृषी कायद्याप्रमाणेच अग्निपथ योजनाही मागे घ्यावी लागेल, राहुल यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.