मुंबई - राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी (Opposition Leader Ajit Pawar) शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यावर भाष्य करत शिंदे सरकारवर टीका केली ( Ajit Pawar Criticized Shinde government ) आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदारच गोळीबार करत आहे, तर गृहमंत्री काय करताय ? आमदार ठोका ठाकीची भाषा करतात, हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. असा विरोधीपक्ष नेते अजित पवारांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे, ते प्रसार माध्यमांशी बोलत ( Shinde group and Shiv Sena firing case ) होते.
मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी गट विकास अधिकारी पत्र काढतात हे महाराष्ट्राचे दुर्दैव राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पैठण येथे सभा आहे. मात्र या सभेला अंगणवाडी सेविका, परिवर्षक यांनी उपस्थित रहावे म्हणून गटविकास अधिकारी यांनी काढलेल्या पत्रावरून विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्य सरकारवर चांगलीच टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी एखाद्या गटविकास अधिकाऱ्याला अशा प्रकारचे पत्र काढावे लागत असेल तर, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. जर अंगणवाडी सेविका पर्यवेक्षक सभेला जाणार असतील तर अंगणवाडीत येणाऱ्या त्या लहान मुलांकडे आज लक्ष कोण देणार ? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच अनेक वर्ष आपणही सत्तेत होतो. मात्र कधीही अशा प्रकारचे पत्र मंत्र्यांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आदेश मिळाल्याशिवाय गट विकास अधिकारी काढू शकत नाही. त्यामुळे या पत्रावर सरकारी पक्षाकडून आता सारवासारव केली जाईल. मात्र सभेसाठी असे पत्र काढणं दुर्दैवी असल्याचं अजित पवार यांनी विधान भवन येथे पत्रकाराशी संवाद साधताना म्हटले आहे. ( Ajit Pawar Criticized Shinde government )
दोन महिने झाले तरीही पालकमंत्री नाहीत राज्यात नवे सरकार येऊन जवळपास दोन महिने झाले. मात्र अद्यापही या सरकारने प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री दिलेले नाहीत. सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. शेतकरी, कष्टकरी अडचणीत आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांची गरज असतानाही अद्याप पालकमंत्री नेमले गेले नाहीत. पालकमंत्री न नेमण्यामागे नव्या सरकारची राजकीय कोंडी कारणीभूत आहे. जे मंत्री नव्या सरकारमध्ये नेमण्यात आले आहेत त्यापैकी बऱ्याच जणांनी अद्यापही कारभार स्वीकारलेला नसल्याचेही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.