ETV Bharat / city

Budget Session : एसटी कामगारांच्या प्रश्नावर विधान परिषदेत विरोधकांचा हल्लाबोल; दुध दर तफावत दूर करण्यासाठी येणार कामस्वरुपी योजना - दूध दर तफावत दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना

एसटी कामगारांना अजून न्याय भेटलेला नाही. कालही ३ कामगारांनी आत्महत्या केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरत जो पर्यंत परिवहन मंत्री याबाबत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा आक्रमक पवित्रा दरेकर ( Opposition attack on question of ST workers Agitation ) यांनी घेतला.

Opposition attack on question of ST workers
विधान परिषदेत विरोधकांचा हल्लाबोल
author img

By

Published : Mar 22, 2022, 5:46 PM IST

मुंबई - एसटी कामगारांच्या प्रश्नावर विधान परिषदेत शेकाप आमदार जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. एसटी कामगारांना अजून न्याय भेटलेला नाही. कालही ३ कामगारांनी आत्महत्या केल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. यावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा हा मुद्दा लावून धरत जो पर्यंत परिवहन मंत्री याबाबत खुलासा करत नाहीत, तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही. असा आक्रमक पवित्रा दरेकर ( Opposition attack on question of ST workers Agitation ) यांनी घेतला. यावर सभागृहाचे कामकाज १० /१० मिनटांसाठी दोनदा तहकूब करण्यात आले. तर दुधाच्या दरात होणारी मोठी तफावत दूर करण्यासाठी कामस्वरुपी योजना आणणार असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले आहे.

एसटी प्रश्नावर मंत्रिमंडळ बैठकीत होणार निर्णय -

याबाबत उत्तर देताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी सांगितले, की हा संप मिटने गरजेचे आहे. या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन हा निर्णय घेण्यात येईल. या करता नेमण्यात आलेल्या त्री सदस्य समितीचा अहवाल कोर्टाने मंजूर केला आहे. तो अहवाल लवकरच मंत्रिमंडळात समोर ठेवून निर्णय घेतला जाईल. परंतु हा निर्णय कधी घेणार हे सांगितले नसल्याने पुन्हा विरोधक आक्रमक झाले. त्यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन निर्णय घ्यावा असे आदेश दिले.

दुधाच्या दरातील तफावतीबाबत सुनिल केदार यांनी दिले उत्तर -

राज्यात पशुसंवर्धन बाबत काय परिस्थिती आहे? गाईच्या दुधासंदर्भात राज्यात दुधाच्या दरात मोठी तफावत आहे, तसेच राज्यातील क्रीडा धोरणा संदर्भात सध्या काय परिस्थिति आहे? याबाबत विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यात आला होता. विशेष म्हणजे हा प्रस्ताव सत्ताधारी सद्यस्यांकडून मांडण्यात आला होता. त्याला मंत्री सुनील केदार यांनी उत्तर दिले.

दूध दर तफावत दूर करण्यासाठी कायमस्वरूपी योजना

विधान परिषदेत राज्यातील पशुसंवर्धन व क्रीडा धोरणाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री सुनिल केदार यांनी उत्तर दिले. या बाबत बोलताना सुनिल केदार म्हणाले की राज्यातील ग्रामीण अर्थ व्यवस्था पशुसंवर्धन माध्यमातून बळकट होत असते. त्यासाठी दूध हा सुद्धा महत्वाचा घटक आहे. राज्यात ग्रामीण भागात व शहरी भागात दुधाच्या दरात फार मोठी तफावत आहे. करोना काळात दुधा पासून भुकटी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. परंतु दुधाच्या दरातील तफावत दूर करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्नशील आहे. ब्राझील मधील गीर गाय ब्राझील मध्ये ३५ लिटर दूध देते तर तीच गाय इथे १५ लिटर दुध देते. यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न असणार आहेत. विदेशी गायींच्या जातींपैकी सर्वात जास्त दूध देणारी गाय ही होलस्टीन फ्रिजियन (एका वेतात १ ते दीड हजार लिटर) ही आहे. ही गाय सध्या पुणे येथील भाग्यलक्ष्मी फार्म येथे असून भारतीय वातावरणात ही गाय एका वेतात ११,५०० लिटर दूध देत आहे. तसेच भारतीय जातींपैकीं सर्वात जास्त दूध देणारी गाय साहिवाल (एका वेतात सरासरी ४ ते ६ हजार लिटर) ही आहे. महाराष्ट्र राज्यातील जातींपैकी सर्वात जास्त दूध देणारी गाय देवणी (एका वेतात एक ते दीड हजार लिटर) ही आहे. ह्या सर्व बाबी बघता दूध दरातील तफावत दूर करण्यासाठी कायम स्वरूपी व्यवस्था करण्याची गरज असल्याचे सांगत सरकार त्या बाबत प्रयत्नशील असल्याचे केदार यांनी सांगितले.

निवृत्त सैनिकांना क्रीडासंकुलमध्ये प्रशिक्षक पदी नेमणार -

राज्यातील क्रीडा धोरणाबाबत बोलताना मंत्री सुनिल केदार म्हणाले, की प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात क्रीडा संकुल बनवण्यात येणार आहे. त्यासाठी असलेला १ कोटी निधी हा ५ कोटी करण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी क्रीडा विद्यापीठ निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. क्रीडा संकुल फक्त निर्माण करून होणार नाही. तर तिथले प्रशिक्षक हे सुद्धा योग्य शिक्षित असणे गरजेचे असून त्यासाठी निवृत्त सैनिकांना त्या पदावर नियुक्त करण्याचा विचारही सरकार करत आहे असेही केदार म्हणाले. ऑलिम्पिकसाठी राज्यातील निवड झालेल्या १० खेळाडूंना प्रशिक्षण व सरावासाठी ५ कोटी रुपये इतके अर्थसहाय्य करणारे देशातील महाराष्ट्र एकमेव राज्य असून नवीन व्यायामशाळेच्या बांधकामाच्या मर्यादा ७ लक्ष रुपयांवरून १२ लक्ष रुपये इतकी करण्याची आवश्यकता, तसेच नवीन व्यायाम शाळांच्या साहित्य खरेदीसाठी जास्त निधीची तरतूद करण्यात आली असल्याचेही केदार यांनी सांगितले.

हेही वाचा - Cow Dung Collecting Machine : विद्यार्थ्याने बनवले जनावरांचे शेण गोळा करणारे यंत्र.. पशुपालकांचा त्रास होणार कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.