ETV Bharat / city

Openly Drug Use In Local : लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

मुंबई लोकल ट्रेनमध्ये हाणामारीची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल ( Openly Drug Use in mumbai ) होत आहे. मात्र, हा व्हिडीओ हाणामारीचा नसून लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन ( Openly Drug Use In Local ) करण्याचा आहेत. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल ( Drug Use video mumbai local ) होताच पोलीस या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.

Openly Drug Use In Local
लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन
author img

By

Published : Feb 24, 2022, 7:30 PM IST

Updated : Feb 24, 2022, 10:55 PM IST

मुंबई - मुंबई लोकल ट्रेनमध्ये हाणामारीची घटना ताजी असताना, पुन्हा एकदा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल ( Openly Drug Use in mumbai ) होत आहे. मात्र, हा व्हिडिओ हाणामारीचा नसून लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन ( Openly Drug Use In Local ) करण्याचा आहेत. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर वायरल ( Drug Use video mumbai local ) होताच पोलीस या अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत.

लोकल ट्रेनमध्ये खुलेआम अमली पदार्थांचे सेवन; सोशल मीडियावर व्हिडीओ वायरल

काय आहे घटना -

मिळालेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये एक प्रवासी गटाकडून अमली पदार्थाचे सेवन केले जात होते. यावर इतर प्रवाशांनी विरोध केला. मात्र, आम्हाला काही फरक नाही पडणार, आताच तुरूंगातून जाऊन आलो आहे, असे त्या गटातील एक जण बोलला. तसेच सहप्रवाशांबरोबर हुज्जत सुद्धा घेतली. तेव्हा एका सजग प्रवाशांनी या अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या गटाचे व्हिडिओ मोबाईलद्वारे काढला. हा व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल केला. तेव्हा आरपीएफ पोलिसांनी यांची दखल घेतली आहे. बेलापूर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासून वरील लोकांचा शोध घेतला जात आहे. या घटनेची माहिती सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. बेलापूर स्थानकातून सुटणाऱ्या सर्व गाड्यांचीही तपासणी करण्यात येत आहे. वरील लोकांशी समन्वय साधून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती आरपीएफने आपल्या अधिकृत ट्विटवर दिली आहेत.

रेल्वेने लक्ष देणे गरजेचे -

मागील काही दिवसांपासून हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांमध्ये आणि लोकल डब्यात भिकाऱ्यांची आणि गर्दुल्यांची संख्या वाढली आहेत. घोळक्याने डब्याच्या दरवाज्यावर बसणाऱ्या गर्दुल्यांमुळे रेल्वे डब्यामध्ये चढ-उतार करताना प्रवाशाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही प्रवाशांचे म्हणणे आहे की, अनेक भिकारी आणि गर्दुल्ले लोकल डब्यात ड्रग्जचे सेवन करतात. आणि काही वेळा यांना हटकले तर अश्लील शब्दही वापरत असल्याने प्रवासी नाईलाजास्तव गप्पगुमान दुसऱ्या डब्यात बसतात. मात्र रेल्वेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहेत अशी प्रक्रिया योगेश घुले या प्रवाशांनी दिली आहे.

हेही वाचा - Fake Baba in Nashik : जादूटोणा झाल्याची थाप मारून आईसह मुलींवर वारंवार बलात्कार; भोंदूबाबाला भावासह अटक

Last Updated : Feb 24, 2022, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.