ETV Bharat / city

Mumbai Nalasafai Online Tracking : मुंबईतील नालेसफाईचे ऑनलाईन ट्रॅकिंग, नागरिकांना घरबसल्या पाहता येणार सद्यस्थिती - मुंबई महापालिका नालेसफाई मोहिम

मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर दरवर्षी टीका होते. ही टीका होऊ नये म्हणून पालिकेने यंदा नालेसफाई पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. नालेसफाईचे ऑनलाइन ट्रॅकिंग केले ( Online tracking of Nalesafai in Mumbai ) जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नाळेसफाईची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पालिकेने डॅशबोर्ड बनवला आहे.

Mumbai Nalasafai Online Tracking
मुंबईतील नालेसफाईचे ऑनलाईन ट्रॅकिंग
author img

By

Published : May 6, 2022, 7:11 PM IST

Updated : May 6, 2022, 7:32 PM IST

मुंबई - मुंबईतील नालेसफाईवरून पालिकेवर दरवर्षी टीका होते. ही टीका होऊ नये म्हणून पालिकेने यंदा नालेसफाई पारदर्शक करण्यावर भर दिला आहे. नालेसफाईचे ऑनलाइन ट्रॅकिंग केले ( Online tracking of Nalesafai in Mumbai ) जाणार आहे. त्यासाठी पालिकेने नाळेसफाईची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पालिकेने डॅशबोर्ड बनवला आहे.

45 टक्के नालेसफाई पूर्ण - दरवर्षी मुंबईतील नदी नाल्यांमधून साचलेला गाळ पावसाळ्यापूर्वी काढून मुंबई बाहेरील डम्पिंग ग्राउंडवर टाकला जातो. मोठ्या नाल्यातुन जवळपास 4 लाख 63 हजार मॅट्रिक टन तसेच छोट्या नाल्यातून व पावसाळी गटारातून 4 लाख 24 हजार मॅट्रिक टन गाळ काढला जातो. इतर गाळ मिळून पालिका यावर्षी 9 लाख 7 हजार 160 मॅट्रिक टन गाळ काढणार आहे. या एकूण गाळापैकी 75 टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढण्यासाठी पालिका प्रयत्नशील असते. यंदा नालेसफाईच्या कामाला उशिराने सुरुवात झाली. आतापर्यंत 45 टक्के नालेसफाई पूर्ण झाली आहे. 30 मे पर्यंत 100 टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रशासनाचा आहे असा दावा पालिकेचे पायाभूत सुविधेचे उपायुक्त उल्हास महाले यांनी प्रशासनाच्या वतीने केला आहे.

उपायुक्त उल्हास महाले यांची प्रतिक्रिया

येथे पाहता येणार नालेसफाई - यंदा नालेसफाईचे काम पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी पालिकेने आपल्या वेबसाईटवर लिंक बनवली आहे. http://swd.mcgm.gov.in/wms2022 या लिंकवर या लिंकवर आपल्या विभागातील नाल्यांची सफाई होते की नाही याची माहिती मुंबईकरांना मिळणार आहे. यावर नालेसफाईची नेमकी स्थिती, गाळ किती काढला, किती वाहने गाळ काढला याची सविस्तर माहिती, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या विभागातील नाले सफाई होते की नाही याची तक्रार करण्याबरोबर नाल्यात आणि गटारात कचरा टाकू नये असे आवाहन महाले यांनी केले आहे.

मुंबईतील नाले -

  • मोठे नाले - 309 लांबी 290 किलोमीटर
  • छोटे नाले - 508 लांबी 600 किलोमीटर
  • रस्त्यालगतची गटारे - लांबी 2004 किलोमीटर
    Mumbai Nalasafai Online Tracking
    मुंबईतील नालेसफाईचे ऑनलाईन ट्रॅकिंग

हेही वाचा - Mumbai Khairne MIDC Fire : खैरने एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

Last Updated : May 6, 2022, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.