मुंबई - बच्चे कंपनीची आवडती राणीबाग कोरोनामुळे गेले ११ महिने बंद होती. कोरोना रुग्णसंख्या कमी होताच राणीबाग म्हणजेच वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय आजपासून पुन्हा पर्यटकांसाठी सुरू झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, आजपासून सुरू करण्यात आलेल्या उद्यानाला पहिल्या दिवशी १,४१९ पर्यटकांनी भेट दिली. यावेळी बच्चे कंपनीसह मोठ्यांनीही शक्ती, करिश्मा या वाघाच्या जोडीला पाहण्याचा आनंद घेतला. तसेच पेंग्विनच्या पाण्यात सूर मारण्याच्या गंमती -जमतीही अनुभवल्या.
बच्चे कंपनीच्या उड्या -
मुंबईत गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमुळे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्यामुळे उद्यान सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आज पहिल्या दिवशी प्राणिसंग्रहालयात पर्यटकांची वर्दळ कमी असली तरी या वन्य प्राण्यांना भेटण्याचा आनंद पर्यंटकांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. उद्यान सुरू झाल्यानंतर पर्यटकांची पावले आपोआपच शक्ती आणि करिश्माच्या पिंजऱ्याकडे वळत होती. राजेशाही थाटातली ही जोडगोळी पाहाण्यासाठी बच्चेकंपनीच्या उड्या पडल्या. त्यानंतर बिबट्याची मादी पिंटो आणि नर ड्रगन तसेच तरस, कोल्हा आणि शेवटी पेंग्विन कक्षाकडे पर्यटक वळत होते.
सोमवार असूनही पर्यटकांनी कुटुंबीयांसह प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट १ हजार ४१९ पर्यटकांनी दिली भेट -सोमवार असूनही पर्यटकांनी कुटुंबीयांसह प्राणिसंग्रहालयाला आवर्जून भेट देत फिरण्याचा आनंद घेतला. ६० वर्षांवरील ज्येष्ठांनी हे उद्यान आणि प्राणिसंग्रहालय मोफत पाहिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनआधी उद्यानाला दरदिवशी पाच ते सहा हजार तर शनिवार-रविवार आणि सुट्टीच्या दिवशी १५ हजारांपर्यंत पर्यटक भेट देत होते. मात्र, आज पहिल्या दिवशी १ हजार ४१९ पर्यटकांनी भेट दिली असून ६९ हजार ६०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.
कर्मचाऱ्यांकडून पर्यटकांचे स्वागत मार्निंग वॉक, उद्यान सहलींनाही परवानगी -मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी ५३ एकर परिसरात पसरलेल्या या उद्यानात देशी-परदेशी झाडे, पुरातन वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे मोकळी आणि खेळती हवा, मोठ्या प्रमाणात आॉक्सजन असल्यामुळे निरोगी आरोग्यासाठी शहरातील अनेक जण केवळ मार्निंग वॉकसाठी या उद्यानात येतात. मात्र, सध्या तरी उद्यानात आत जाणाऱ्या मुख्य गेटजवळील इन्ट्रन्स प्लाझापर्यंत आजपासून मार्निंग वॉकला परवानगी देण्यात आली आहे. मार्निंग वॉकसाठी १५० रुपयांचा पास दिला जातो. उद्यानात असलेल्या शेकडो झाडांची ओळख करून देणाऱ्या उद्यान सहलींनाही परवानगी देण्यात आली आहे.
भाऊ दाजी लाड संग्रहालय सुरू -वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाच्या आवारात मुंबई आणि मुंबईचा उगम, जुन्या नावासह सुरुवातीची लोकसंस्कृती याची माहिती देणारे भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहालयही आजपासून सुरू झाले आहे. मात्र, त्याचे स्वतंत्र व्यवस्थापन असून पालिकेकडे त्याची जबाबदारी नाही. पहिलाच दिवस असल्यामुळे पर्यटकांची संख्या इथेही कमी होती.
"द मुंबई झू" 'सोशल मीडिया पेजचे लोकार्पण - वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात होणारे विविध शैक्षणिक कार्यक्रम तसेचइतर कार्यक्रम प्रभावीपणे मुंबईकरांपर्यंत पोहोचवण्याकरिता वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज (फेसबुक, युट्यूब, ट्विटर आणि इंस्टाग्राम) " द मुंबई झू " या नावाने सुरू करण्यात येत आहे. "द मुंबई झू" या नावाने सुरू करण्यात येणाऱ्या 'सोशल मीडिया पेज'चा लोकार्पण सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज, १६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता प्राणिसंग्रहालयाच्या थ्रीडी प्रेक्षागृहामध्ये आयोजConclusion: