ETV Bharat / city

चक्क 10 कोटी रुपयाला विकले एक रुपयाचे नाणे

जर तुमच्याकडे जुन्या काळातील नाणी असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ज्यामुळे तुम्ही लाखो, करोडो रुपये कमवू शकता. काही लोक आहेत, ज्यांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याची आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्मवर विकण्याची एक विचित्र आवड आहे. असे लोक भरपूर पैसे कमवतात. नुकतेच एका ऑनलाईन लिलावात एक रुपयाचे नाणे तब्बल 10 कोटी रुपयाला विकले आहे.

One rupee coin sold for Rs 10 crore
एक रुपयाचे नाणे विकले चक्क 10 कोटी रुपयाला
author img

By

Published : Sep 23, 2021, 7:24 PM IST

मुंबई - जर तुमच्याकडे जुन्या काळातील नाणी असतील तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ज्यामुळे तुम्ही लाखो, करोडो रुपये कमवू शकता. काही लोक आहेत, ज्यांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याची आणि त्यांना योग्य प्लॅटफॉर्मवर विकण्याची एक विचित्र आवड आहे. असे लोक भरपूर पैसे कमवतात. नुकतेच एका ऑनलाईन लिलावात एक रुपयाचे नाणे तब्बल 10 कोटी रुपयाला विकले आहे. हे नाणे भारतातील ब्रिटिश राजवटीत 1885 मध्ये बनवण्यात आलेले दुर्मीळ नाणे होते.

जुन्या नाण्यांच्या संग्राहकांसाठी संधी -

प्रत्येक व्यक्तीला काहीतरी छंद असतो, त्याला तो जपायला फार आवडतो, कारण त्यातून त्याला पैसे जरी मिळत नसले तरी आनंद नक्कीच मिळतो. परंतु त्यातुनच काही लोक आपल्या छंदाला आपल्या उपजिविकेचे साधन देखील बनवतात. तर काही लोक आपल्या छंदासाठी पैसे मोजायलाही तयार असतात. जुनी दुर्मीळ नाणी गोळा करण्याची देखील आवड असते. पुष्कळ लोकांना प्राचीन वस्तू गोळा करण्याचा छंद असतो. अशा शौकिन लोकांकडे जुन्या आणि दुर्मीळ नाण्यांचा संग्रह असतो. असा छंद असणाऱ्यांना Numismatist म्हणतात. हे लोक काही जुनी नाणी विकत घेतात. ज्याच्या बदल्यात ते समोरील व्यक्तीला पैसे मोजतात. त्यामुळे तुमच्याकडे जर काही जुनी नाणी असतील तर तुम्ही देखील या संधीचा फायदा उचलून ती नाणी विकून पैसे कमावू शकता.

तुम्ही 'येथे' विकू शकता जुनी नाणी -

जर तुमच्याकडे देखील जुनी दुर्मीळ नाणी असतील तर तुम्हालाही या नाण्यांच्या बदल्यात लाखो आणि करोडो रुपये मिळू शकतात. अट एकच, आपल्याला योग्य मूल्याचे खरेदीदार मिळाले पाहिजेत. अनेक ऑनलाइन साईट्स (Quickr, eBay, olx, indiancoinmill, indiamart, coinbazar इ.) ही नाणी विकण्यासाठी आणि खरेदी करण्यासाठी प्लॅटफॉर्म पुरवतात. येथे आपण आपली नाणी नोंदणी आणि विकू शकता. एकदा तुमची नोंदणी झाली की, खरेदीदार तुमच्याशी संपर्क साधतील आणि नंतर तुम्ही तुमचे नाणे जास्त किमतीला विकू शकता किंवा तुम्ही त्यांच्याशी ऑफलाईन संपर्क करूनही नंतर व्यवहार करू शकता. मात्र हे व्यवहार होताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी स्वतः घेतली पाहिजे.

हेही वाचा - गोष्ट एका अनोख्या लग्नाची.. 66 वर्षांची नवरी आणि 79 वर्षांच्या नवरदेवाने बांधली लग्नगाठ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.