ETV Bharat / city

वांद्र्यात इमारतीचा भाग कोसळून एकाचा मृत्यू, ५ जण जखमी - वांद्र्यात इमारत कोसळली

वांद्रे खेरवाडी येथील एक चार मजली इमारतीचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत.

building collapse in Bandra
building collapse in Bandra
author img

By

Published : Jun 7, 2021, 2:59 PM IST

मुंबई - वांद्रे खेरवाडी येथील एक चार मजली इमारतीचा काही भाग बाजूच्या घरावर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५ जण जखमी झाले आहेत. जखमींना वांद्रे येथील भाभा तसेच व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

१७ जणांना बाहेर काढले -

वांद्रे खेरवाडी येथे चार मजली इमारतीचा काही भाग बाजूच्या दोन मजली घरावर रात्री एकच्या सुमारास कोसळले. घर कोसळल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ६ जणांना बाहेर काढले. घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाचे जवान दाखल झाल्यावर त्यांनी ११ जणांना बाहेर काढले. या घटनेत जखमी झालेल्यांना पालिकेच्या वांद्रे भाभा आणि व्ही.एन. देसाई रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.

१ मृत्यू, ५ जखमी -

व्ही. एन. देसाई रुग्णालयात दोन जणांना दाखल करण्यात आले. त्यापैकी रियाझ अहमद (२८ वर्ष) याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी मृत्यू झाला. तर नूरल हक हैदर अली सय्यद (२१ वर्ष), सलमान खान (२४ वर्ष), राहुल खोत (२२ वर्ष), रोहन खोत (२२ वर्ष), लता खोत (४८ वर्ष) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून कळवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.