ETV Bharat / city

प्रत्येक वर्षी २६ जुलै'ची आठवण! मुंबईत तब्बल १४९३ नागरिकांचा झाला होता मृत्यू; वाचा सविस्तर - Mumbai rains of 26 July 2005

भारताची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईत (२६ जुलै २००५)ला अतिवृष्टी झाली होती. ( Rain in Mumbai ) या अतिवृष्टीमुळे मुंबई ठप्प होऊन १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १७ वर्षे झाली आहेत. आजही मुंबईत काही तास मुसळधार पाऊस पडल्यावर २६ जुलैच्या आठवणी ताजा केल्या जातात. मुंबईमध्ये अशा घटना पुन्हा होऊ नये म्हणून महापालिकेकडून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामुळे मुंबईकरांना यावर्षी काहीसा दिलासा मिळाला आहे. मुंबई महापालिकेने केलेल्या कामाची स्थुती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

२६ जुलै 2005 ला मुंबई झाली होती ठप्प
२६ जुलै 2005 ला मुंबई झाली होती ठप्प
author img

By

Published : Jul 25, 2022, 9:09 PM IST

मुंबई - २६ जुलै २००५ ला मुंबईत १८ तासात ९९४ मिलीमीटर इतका पाऊस पडला होता. मुंबईत पडणाऱ्या पावसाच्या जवळपास निम्मा पाऊस काही तासात पडल्याने मायानगरी मुंबईत महापूर आला होता. मिठी नदीने रौद्र रूप धारण केल्याने मुंबई जलमय झाली होती. मुंबईकरांची घरे, दुकाने, वाहने पाण्याखाली गेली होती. मिठी नदी किनारच्या इमारतींच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी पोहचले होते. मुंबईमधील रस्ते, ट्रेनची वाहतूक ठप्प झाली होती. ( Mumbai rains of 26 July 2005 ) मुंबईत सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मुंबईकरांनी आहे त्याच ठिकाणी राहणे पसंद केले. जलप्रलया दरम्यान पाण्यात बुडून तब्बल १४९३ जणांचा मृत्यू झाला होता. पावसामुळे मुंबई ठप्प झाल्याने ५०० कोटीं रुपयांचे नुकसान झाले होते. १४ हजार घरांमध्ये पाणी शिरल्याने घरामधील सामानाचे नुकसान झाले होते. पाण्यामुळे ५२ लोकल ट्रेन, ४ हजार टॅक्सी, ३७०० रिक्षा, ९०० बेस्टच्या बसेसचेही नुकसान झाले होते.

या केल्या आहेत उपायोजना - मुंबई समुद्राच्या किनारी आहे. मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुसळधार पाऊस पडल्यास पाणी साचते. २६ जुलै २००५ मध्ये ९९४ मिलीमीटर पाऊस एकाच दिवशी पडल्याने १४९३ नागरिकांचा मृत्यू झाला होता. मुंबई ठप्प झाल्याने सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. ( July 26, 2005, 1493 people died in Mumbai ) अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून राज्य सरकार आणि पालिकेने मिठी नदीचे रुंदीकरण, सौंदर्यीकरण, नदी पात्रातील बांधकामे हटवणे, मुंबईमधील पडणाऱ्या पावसाचे पाणी समुद्रात आणि खाडीत सोडण्यासाठी नाल्यांची रुंदी आणि खोली वाढवणे, पावसाचे पाणी अधिक गतीने समुद्रात सोडता यावे म्हणून पम्पिंग स्टेशन उभारणे आदी प्रकल्प हाती घेतले आहेत. मिठी नदीचे रुंदीकरण, खोलीकरण, सुशोभीकरण याचे काम आजही सुरु आहे. काही वर्षांपूर्वी मुंबईत हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे आदी ठिकाणी पावसाचे पाणी १० ते १५ तासाहून अधिक साचलेले असायचे. गेल्या एकृदोन वर्षात हा कालावधी कमी झाला आहे. या वर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसात मुसळधार पाऊस पडला. त्यानंतरही दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल आदी ठिकाणी जास्त वेळ पाणी साचलेले नाही.

६ पम्पिंग स्टेशन सुरु - ब्रिमस्टोवॅड अहवाल आणि चितळे समितीच्या शिफारशीनुसार मुंबईमध्ये एकूण आठ ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करणारी पंपिंग स्टेशन बनवण्याचा निर्णय घेतला होता. या आठपैकी हाजीअली, ईला, लव्ह ग्रोव्ह, क्लीव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध या सहा उदंचन केंद्रांची कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. हाजी अली पम्पिंग स्टेशनसाठी १०० कोटी, इर्ला पम्पिंग स्टेशनसाठी ९० कोटी, लव्हग्रोव्ह पम्पिंग स्टेशनसाठी १०२ कोटी, क्लिव्हलँड बंदर पम्पिंग स्टेशनसाठी ११६ कोटी, ब्रिटानिया पम्पिंग स्टेशनसाठी १२० कोटी, गझदर पंपिंग स्टेशनसाठी १२५ कोटी रुपये खर्च केले आहेत. शहरात साचलेले पाणी पर्जन्य जल वाहिन्यांद्वारे या पम्पिंग स्टेशनमध्ये आणले जाते. त्यानंतर समुद्राला भरती नसताना हे पाणी समुद्रात सोडले जाते. समुद्राला भरती असताना पम्पिंग स्टेशनचे गेट बंद केले जातात. भरती ओसरल्यावर हे पाणी समुद्रात सोडण्याचे काम या पम्पिंग स्टेशनद्वारे केले जाते.

पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या - पावसाळ्यात विशेष करून दादर हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, सायन, अंधेरी मिलन सब वे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी पाणी साचल्यास ते १० ते १५ तासाहून अधिक वेळ साचून राहत होते. पालिकेने मुंबईमधील पर्जन्य जल वाहिन्यांची क्षमता २५ मिलीमीटर होती ती ५० मिलीमीटर इतकी केली आहे. हिंदमाता परिसरात प्रमोद महाजन गार्डन व झेवीयर्स गार्डन या दोन ठिकाणी मोठ्या भूमीगत टाक्या बनवण्यात आल्या आहेत. या टाक्यांमध्ये ३ कोटी लिटर पाणी साठा होऊ शकतो. हिंदमाता येथील पावसाचे पाणी या टाकीत साचल्यानंतर पंपाच्या साहाय्याने ते समुद्रात सोडण्यात येत आहे.

परळ येथे दोन रॅम्प उभारण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा हिंदमाता येथे पावसाचे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. मिलन सब वे जवळही अशाच प्रकारच्या भूमिगत टाक्या उभारण्याचे काम सुरु आहे. मुंबईत ३८६ फ्लडिंग पाॅईट्स म्हणजेच पाणी साचणारी ठिकाणे होती. त्यापैकी यंदा २८२ फ्लडिंग पाॅईट्स कमी झाले आहेत. तर १०४ फ्लडिंग पाॅईट्स असून त्यापैकी ३० फ्लडिंग पाॅईट्स जवळ उपाययोजना करण्यात आल्या आहेत. उर्वरित ७१ ठिकाणी उपाययोजना करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत ७१ फ्लडिंग पाॅईट्स पूरमुक्त होतील. फ्लडिंग स्पॉट पूर मुक्त करण्यासाठी ८०० कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी दिली आहे.

मिठी नदीचे काम आजही अर्धवट - मुंबईतील जलप्रलयाचा अभ्यास करताना, मिठी नदीवरील अनधिकृत बांधकामांमुळे नदीचे पात्र छोटे झाल्याने पाणी समुद्रात जाण्यास अडथळा निर्माण झाल्याचे समोर आले. मिठी नदीचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले. एमएमआरडीए आणि पालिकेला हे काम देण्यात आले. पुढे एमएमआरडीएने या कामातून बाहेर पडत हे काम महापालिकेच्या माथी मारले. आजही मिठी नदीच्या रुंदीकरणाचे आणि सुशोभीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही.

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचे काम आजही अपूर्णच - मुंबईतील पावसाळी पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी व पुरावर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने १९९३ मध्ये ब्रिमस्टोवॅड प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. (२६ जुलै २००५)ला मुंबई जलमय झाल्याने २००७ पासून याची अंमलबजावणी कारण्यात आली. नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण करणे, त्यावरील अतिक्रमणे हटवणे आदी कामे यामधून केली जात आहेत. त्यासाठी पालिकेने १२०० कोटी रुपये खर्च करण्याचे नियोजन केले होते. आतापर्यंत पालिकेने तीन पट खर्च केला आहे. तरीही अद्याप हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. याचे काही काम अद्यापही बाकी आहे.

आपत्कालीन व्यवस्थापन विभाग - २६ जुलैच्या घटनेनंतर बचावकार्य व सर्व सरकारी यंत्रणांमध्ये समन्वय राखता यावा म्हणून मुंबई महापालिकेत आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली. मुंबईत आग लागणे, घरे, इमारती कोसळणे, समुद्रात नाल्यात वाहून जाणे आदी घटना आपत्कालीन घटना घडल्यावर हा विभाग सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याचे काम करत असतो. मुंबईत पाणी साचण्याच्या ठिकाणी विशेष करून मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यावर या विभागाकडून समन्वय साधून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी दरवर्षी हलवले जाते.

मुंबई खऱ्या अर्थानं पूरमुक्त होईल - हिंदमाता व किंग सर्कल येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद होऊन मुंबई ठप्प होते. हिंदमाता जवळ दोन ठिकाणी भूमिगत पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे यंदा हिंदमाता येथे पाणी जास्त काळ साचून राहिलेले नाही. येत्या २ ते ३ वर्षात माहुल व मोगरा पंपिंगचे काम पूर्ण झाल्यावर मुंबई खऱ्या अर्थानं पूर मुक्त होईल, असा विश्वास महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून कौतुक - हिंदमाता येथे पाणी साचून राहायचे पण आता ते कमी झाले आहे. पालिकेने पम्पिंग स्टेशन उभारली, पंप लावले, इतरही उपाययोजना केल्यायामुळे पाणी जास्त वेळ साचून राहिलेले नाही. हे पालिकेने केलेल्या कामामुळे झाले आहे, असे कौतुक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

उपाययोजनांमुळे पाण्याचा निचरा लवकर - मुंबईची भौगोलिक परिस्थिती पाहता कमी तासात जास्त पाऊस पडल्यानंतर पाणी साचते. पाण्याचा निचरा करता यावा म्हणून ४७७ मोठे पंप लावण्यात आले आहेत. त्याद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. तसेच, मुंबईमध्ये सहा ठिकाणी पम्पिंग स्टेशन उभारण्यात आली आहेत. त्याद्वारे साचलेले पाणी समुद्रात सोडले जाते. हिंदमाता येथे भूमिगत टाक्या उभारण्यात आल्या आहेत. यामुळे यावर्षी जास्त वेळ पाणी साचलेले दिसले नाही. मुंबईमध्ये पाणी साचणार नाही असा दावा कधीच कोणीही करणार नाही. गेल्या काही वर्षात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे पाण्याचा निचरा लवकर होत आहे. त्याची स्तुती राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अशी प्रतिक्रिया मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा - Rakshabandhan: ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या नावाने राख्या, नागरिकांची मोठ्या प्रमाणात पसंती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.