ETV Bharat / city

आषाढी एकादशीला १० मानाच्या पालख्यांचा 'लालपरी'तून होणार प्रवास; मंत्री परब यांची माहिती - Ashadhi Ekadashi palkhi pandharpur

आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. पालखी सोहळा नेत्रदीपक, तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ 'लालपरी' बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

Ashadhi Ekadashi palkhi pandharpur
मानाच्या पालख्या एसटी प्रवास
author img

By

Published : Jun 19, 2021, 3:10 PM IST

Updated : Jun 19, 2021, 7:57 PM IST

मुंबई - आषाढी एकदशीनिमित्त अवघ्या वारकरी संप्रदायाला वारी सोहळ्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरची ओढ लागलेली असते. भक्तीरसात चिंब होऊन विठू नामाचा जयघोष करीत वारकरी पालख्या घेऊन पायी श्री विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. हा पालखी सोहळा नेत्रदीपक, तसेच वारकऱ्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी एसटी महामंडळ 'लालपरी' बसेस देणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

हेही वाचा - अँटिलिया-मनसुख हिरेन प्रकरण : प्रदीप शर्मा व सचिन वाझे यांनीच रचला कट; 'एनआयए'चा दावा

१९ जुलैला रवाना होणार बसेस

मागील वर्षी प्रमाणे यंदाही मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल ॲड. परब यांनी समाधान व्यक्त करत वारकरी संप्रदायाची सेवा करण्याची अशीच संधी मिळो, अशी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्य सरकारने राज्यातील १० मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. १९ जुलै रोजी या बसेस पालख्यांबरोबर पंढरपूरकडे रवाना होतील. त्यासाठी संबंधित संस्थानांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामुल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणार

एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थान विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालखीसाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना स्थानिक एसटी प्रशासनाला महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच, या पालख्यांचा मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंतचा प्रवास एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेस, प्रवासादरम्यान वारकऱ्यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री परब यांनी दिली.

हेही वाचा - 'भविष्यातही देशाच्या राजकारणात शिवसेनेची घोडदौड सुरू राहील'

Last Updated : Jun 19, 2021, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.