मुंबई - जगभरात ओमायक्रोन विषाणूचा धोका वाढल्याने मुंबई विमानतळावर प्रवाशांच्या चाचण्या केल्या जात आहेत. १ नोव्हेंबरपासून आजतागायत तपासणीतील एकूण २८ नमुने जनुकीय तपासणी म्हणजेच जिनोम सिक्वेनसिंगसाठी ( genome sequencing test ) पाठविण्यात आले आहेत.
१ नोव्हेंबरपासून १२ नमुने एनआयव्ही पुणे येथे तर १६ नमुने कस्तुरबा रुग्णालय प्रयोगशाळा येथे तपासण्यासाठी ( genome sequencing test send to NIV ) पाठविण्यात आले आहेत. या एकूण २८ जणांपैकी २५ जण आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत तर ३ जण त्यांचे निकटसहवासित आहेत.
ओमायक्रोन व्हेरियंटचा धोका -
२६ नोव्हेंबर २०२१ रोजी ( WHO on Omicorn variant ) जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशामध्ये आढळून आलेल्या कोविड १९ विषाणूच्या व्हेरियंटला ओमायक्रॉन असे नाव दिले असून व्हेरीयंट हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न असल्याचे नमूद केले आहे. विषाणूमधील या जनुकीय बदलामुळे त्याला काही विशेष गुणधर्म प्राप्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या बदलामुळे विषाणू प्रसाराचा वेग वाढल्याचे सध्या दिसत आहे. त्यामुळे आजाराची तीव्रता वाढेल का किंवा हा नवा विषाणू प्रतिकार शक्ती भेदून संसर्ग करू शकेल का, याबाबत आताच निश्चित भाष्य करणे कठीण आहे. असे असले तरी येत्या दोन आठवड्यात याबद्दल अधिक माहिती मिळू शकेल. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा-Booster Dose Need for Omicron : ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी 'बूस्टर डोस' आवश्यक: तज्ज्ञ
२८ नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी -
आज सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ८६१ आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी ( RTPCR test of 861 passengers in Mumbai airport ) करण्यात आली आहे. त्यापैकी ३ जण आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आले आहेत. या तिघांचेही नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. याशिवाय राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरू आहे. विमानतळ आणि क्षेत्रिय अशा दोन्ही सर्वेक्षणातून आतापर्यंत एकूण २८ नमुने जिनोम सिक्वेनसिंगसाठी पाठविण्यात आले आहेत.
हेही वाचा-Omicron In India : भारतात ओमायक्रॉनचा शिरकाव, कर्नाटकमध्ये सापडले दोन रुग्ण
विदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांनी माहिती द्यावी -
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरुप वर्तनाचा अंगिकार करावा, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे आणि मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात आले आहेत त्यांनीही आपल्या बाबत स्थानिक आरोग्य विभागाला कळवावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण
भारतात ओमायक्रॉन ( Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटचा शिरकाव झाला आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉन व्हेरीयंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी दिली आहे.