मुंबई - राज्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात ( Corona third wave threat in MH ) येत असला तरी आज कोरोनाच्या रुग्ण संख्या कमालीची घटली आहे. कोरोनाचे आज दिवसभरात 569 रुग्ण आढळून आले. तर ओमायक्रोनचे नवे 2 रुग्ण सापडले आहेत. राज्यात ओमायक्रोनची एकूण रुग्ण संख्या वीसच्या घरात पोहोचली आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोना रुग्ण संख्येत कमालीचे चढ-उतार दिसून येत आहेत. कोरोनाग्रस्तांचा आजपर्यंतचा आकडा 64 लाख 94 हजार 452 पर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा-विशेष संवाद : अमेरिकेतील डॉ. रवी गोडसेंनी केलं बुस्टर डोसचं समर्थन
6482 अॅक्टिव्ह रुग्ण
राज्यात आज 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 498 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 93 हजारवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.72 टक्के आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 69 लाख 58 हजार 681 चाचण्या करण्यात आल्या आहेत. एकूण करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी 09.92 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 74 हजार 190 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. 6 हजार 507 अॅक्टिव्ह ( 6507 corona active cases ) रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 160
ठाणे पालिका - 21
नवी मुंबई पालिका - 33
कल्याण डोबिवली पालिका - 14
वसई विरार पालिका - 9
नाशिक पालिका - 18
अहमदनगर - 39
अहमदनगर पालिका - 10
पुणे - 55
पुणे पालिका - 54
पिंपरी चिंचवड पालिका - 23
हेही वाचा-First Omicron Death : चिंता वाढली! इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा जगातील पहिला मृत्यू
32 प्रवाशांची जनुकीय चाचणी
राज्यात ओमायक्रोनचा संसर्ग सुरू आहे. आज पुणे आणि लातूर येथे प्रत्येकी ओमायक्रॉनचे 2 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये महिला आणि पुरुष रुग्णाचा समावेश आहे. दोघांनाही विलगीकरणात ठेवले आहे. दोघांनी दुबईहून प्रवास केला आहे. संपर्कात आलेल्या त्यांच्या निकटवर्तीयांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
1 डिसेंबरपासून आजपर्यंत 85, 078 प्रवासी मुंबईत उतरले. एकूण 14 हजार 777 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 24 आणि इतर देशांतील 8 अशा एकूण 32 प्रवाशांची जनुकीय चाचणी ( 32 passengers genome sequencing ) करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत. यापैकी 20 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
जगात ओमायक्रॉनच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू
ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगात ( First Omicron Death ) पहिला बळी गेला आहे. हा मृृत्यू झाल्याची माहिती इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ( British Prime Minister on Omicron Death In UK ) दिली आहे.