मुंबई : शिवसेना आणि अपक्ष उमेदवार संभाजीराजे यांच्यानंतर ओबीसी नेते हरिभाऊ राठोड रिंगणात उतरले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन राठोड यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी आता जोरदार रस्सीखेच ( Rope for the sixth seat of Rajya Sabha ) सुरू झाली आहे.
ओबीस नेते राठोड यांचा पाठपुरावा : शिवसेनेचा मुख्यमंत्री आम्हाला हवा होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, याचा अत्यानंद आहे. महाविकास आघाडी सरकार व्यवस्थित सुरू आहे. सरकार बनत असताना बंजारा आणि ओबीसी समाजाने शिवसेनेला पाठिंबा दिला. मित्रपक्ष म्हणून आमचा हक्क असून, आम्हालाही राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी उमेदवारी द्यावी, अशी मागणी हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची राठोड यांनी भेट घेतली. दरम्यान, लोकसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवार म्हणून इच्छुक असून नावाचा विचार करावा, अशी मागणी केल्याचे राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संभाजीराजे, शिवसेना तिढा सुटेना : अपक्ष उमेदवार संभाजीराजे यांनी सहाव्या जागेसाठी रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेनेही सहाव्या जागेवर दावा केला आहे. तसेच संभाजीराजेंनी शिवसेनेतून राज्यसभेवर जावे, अशी अटकळ घातली आहे. तर संभाजीराजेंकडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही. शिवसेनेने उमेदवार देण्याची तयारी सुरू केली. मात्र, संभाजीराजेंनी आज उमेदवारीबाबतचा निर्णय पुन्हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात टाकला. यामुळे पुन्हा सस्पेन्स वाढला असून, सहाव्या जागेसाठी नेमकं कोणाला संधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.