ETV Bharat / city

इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ ; अजित पवारांची उपस्थिती - ajit pawar in ministry

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या एकजुटीतून एक मजबूत आणि हिंसाचारमुक्त भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गांधींच्या जयंतीनिमित्त केले.

ajit pawar in mumbai
इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ ; अजित पवारांची उपस्थिती
author img

By

Published : Nov 19, 2020, 3:17 PM IST

Updated : Nov 19, 2020, 3:31 PM IST

मुंबई - माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांतांच्या एकजुटीतून एक मजबूत आणि हिंसाचारमुक्त भारत घडविण्याचे स्वप्न पाहिले होते. ते पूर्णत्वास नेण्याचा निर्धार करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त केले. इंदिराजींच्या जयंतीदिनी साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी निष्ठापूर्वक काम करण्याची शपथ त्यांनी उपस्थितांना दिली.

इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ ; अजित पवारांची उपस्थिती

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात स्वर्गीय इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव संजय कुमार, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे, उपसचिव ज. जी. वळवी आदी मान्यवरांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थितांनी यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त देशाचं स्वातंत्र्य व राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी निष्ठापूर्वक कार्य करण्याची शपथ घेतली. आपसातील सर्व धार्मिक, भाषिक किंवा प्रादेशिक मतभेद व तंटे किंवा इतर राजकीय किंवा आर्थिक गाऱ्हाणी शांततामय व संवैधानिक मार्गाने सोडवण्याचे प्रयत्न करण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.

देश हिंसाचारमुक्त करण्यात आपलंही योगदान असावं - अजित पवार

स्वर्गीय श्रीमती इंदिराजींनी देशाची स्वतंत्रता, एकता, अखंडता, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी जीवनभर कार्य केलं. त्यासाठी प्राणांचं बलिदान दिलं. त्यांच्या कार्याचं व बलिदानाचं स्मरण करत असतानाच आपापसातील वाद, मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवण्याचा व देश हिंसाचारमुक्त करण्यात आपलंही योगदान असलं पाहिजे. स्वर्गीय इंदिरा गांधींनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात दिलेल्या योगदानाचं तसंच स्वातंत्र्योत्तर काळात पंतप्रधान म्हणून केलेल्या कार्याचंही त्यांनी स्मरण केलं. बांगलादेशची निर्मिती, बँकाचं राष्ट्रीयकरण, अलिप्त राष्ट्र शिखर परिषदेचं नेतृत्वं करताना इंदिराजींनी बजावलेल्या भूमिकेचं स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Last Updated : Nov 19, 2020, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.