ETV Bharat / city

ST Workers Strike : एसटीचा संपात फूट; कामावर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली! - एसटी कर्मचारी संप

गेल्या दोन दिवसांपासून संपात फूट पाडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आज (रविवारी) राज्यभरात 4 हजार एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून आज दिवसभरात 1 हजार 764 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. यामुळे राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूड पाडण्यात यश मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

एसटी
एसटी
author img

By

Published : Nov 14, 2021, 7:44 PM IST

मुंबई - एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करा, या प्रमुख मागणीसाठी एकीकडे गेल्या 17 दिवसांपासून संप सुरु आहे. मात्र, दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून संपात फूट पाडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. आज (रविवारी) राज्यभरात 4 हजार एसटी कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून आज दिवसभरात 1 हजार 764 प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. यामुळे राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूड पाडण्यात यश मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

लालपरी पुन्हा धावू लागली

राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. देशव्यापी लॉकडाउननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली आहे. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांच्या संपामुळे एसटीच्या राज्यभरातील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान संपात फूट पडली असून शुक्रवारपासून तुरळक प्रमाणात एसटी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. शुक्रवारी 1 हजार 500 शनिवारी 3 हजार आणि रविवारी अर्थात आज 3 हजार 987 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. यामुळे आज राज्यभरातील सर्व विभागातील डेपोमधून बसेस बाहेर पडल्या आहे.

कामावर येणाऱ्यांची संख्या वाढली

एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यभरातून 60 मार्गावर, शिवनेरी, शिवशाही आणि साध्या अशा एकूण 79 बसेस धावल्या आहेत. या बसेसमधून 1 हजार 764 प्रवाशांनी प्रवास केला आहे. विशेष म्हणजे आज सुटलेल्या वसेसपैकी सर्वाधिक बसेस लांबपल्याचा बसेस होत्या. ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा आहे. आज एसटी महामंडळाली प्रशासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 2 हजार 483 होती. तर कार्यशाळेतील 1 हजार 232, चालक 195 आणि वाहक 77 अशी आज एकूण 3 हजार 987 कर्मचारी कामावर हजर झाले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे.

'परिवहन मंत्र्यांकडून संपात फूट पाडण्याचा प्रयत्न'

परिवहन मंत्री अनिल परब तुच्छ पद्धतीचे राजकारण करून आणि प्रसार माध्यमावर खोट्या बातम्या पसरवून एसटीच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज (रविवारी) केला आहे. पडळकर म्हणाले की, परिवहन मंत्री अनिल परब यांना मला सांगायचंय की आपण खुप चांगले राजकारणी आहात, पण एसटी कर्मचाऱ्यांबाबात असे तुच्छ पद्धतीचे राजकारण आपण करू नये. कारण आपल्या असंवदेनशीलपणामुळे ३६ जणांनी जीव गमावले आहे. तरीही आपल्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या दुख:ची जाणीव होत नाही. राज्यभरातील तीन हजार कर्मचारी कामावर परतले, अशा खोट्या बातम्या आपण वृत्तपत्रात पसरवत असून कर्मचाऱ्यांमध्ये फूट पाडून उद्रेक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपीही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

हेही वाचा - ST Workers Strike : परिवहन मंत्र्यांकडून तुच्छ पद्धतीचे राजकारण, एसटी संपात फूट पाडण्याचा प्रयत्न - पडळकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.