ETV Bharat / city

कोविड केंद्रांचा रुग्ण'भार' अखेर हलका; अंदाजे 80 टक्क्यांनी रुग्ण घटले - मुंबई कोरोना रुग्णसंख्या कमी

एप्रिलपासून राज्य सरकारने कोविड केंद्र उभारत खाटा आणि मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईत 6 कोविड केंद्र कार्यरत करण्यात आली असून कोरोना काळात या केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोठ्या संख्येने या केंद्रांंमधून रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

मुंबई
मुंबई
author img

By

Published : Dec 15, 2020, 9:04 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची वाढ झपाट्याने होऊ लागल्यानंतर एप्रिलपासून राज्य सरकारने कोविड केंद्र उभारत खाटा आणि मनुष्यबळ वाढवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबईत 6 कोविड केंद्र कार्यरत करण्यात आली असून कोरोना काळात या केंद्रांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मोठ्या संख्येने या केंद्रांंमधून रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. पण, एक काळ असा होता की, या सर्व कोविड केंद्रांमध्ये मोठा रुग्ण'भार' होता, अर्थात रुग्णांची संख्या वाढती होती. पण, आता मात्र हा भार खूपच कमी झाला आहे. रुग्णांची संख्या जवळपास 80 टक्क्यांनी तर काही केंद्रांमध्ये 90 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यातही येथील गंभीर रुग्ण ही खूपच कमी झाले आहेत. त्यामुळे ही बाब नक्कीच दिलासादायक मानली जात आहे.

6 कोविड सेंटर उभारले

मार्चपासून कोरोना सुरू झाला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा कहर वाढू लागला. रुग्णांसाठी खाटा कमी पडू लागले. अगदी सर्व पालिका आणि सरकारी रुग्णालये कोविडमध्ये रूपांतरीत करूनही खाटा आणि मनुष्यबळ कमी पडू लागले. त्यामुळे कोविड केंद्रांची संकल्पना पुढे आणण्यात आली. त्यानुसार एमएमआरडीए, म्हाडा, सिडको, पालिका यांच्या माध्यमातून कोविड केंद्र उभारण्यात आली. मनुष्यबळही उभारण्यात आले. तर ही कोविड केंद्र पालिकेच्या माध्यमातून चालवली जाऊ लागली. या कोविड केंद्रांमध्ये सुरुवातीला फक्त लक्षणे नसलेल्या रुग्णांना सामावून घेतले जात होते. पण, पुढे मात्र गंभीर रुग्णांवरही येथे उपचार होऊ लागले. त्यासाठी अतिदक्षता खाटाही तयार करण्यात आले. सर्व सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या. वरळी, रेसकोर्स, नेस्को, बीकेसी, दहिसर आणि मुलुंड असे सहा कोविड केंद्र उभारले गेले असून यातून हजारो रुग्ण बरे होऊ घरी गेले आहेत.

आता रुग्ण संख्या घटली

जुलै ते नोव्हेंबर अखेरपर्यंत मुंबईत रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळे साहजिकच कोविड केंद्रांमध्येही रुग्ण अधिक होते. दरम्यान, कोरोना काळात नॉन-कोविड रुग्णांचे हाल होत होते. ही बाब लक्षात घेत दोन महिन्यांपूर्वी पालिकेने सर्व कोविड रुग्णालये नॉन कोविड रुग्णांसाठीही खुले केले. कोविडसाठीचे बेड कमी करत अधिकाधिक रुग्ण कोविड केंद्रांमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मोठ्या संख्येने कोविड केंद्रांमध्ये रुग्ण उपचार घेताना दिसले. पण, आता मात्र कोरोना नियंत्रणात आला आहे. रुग्ण कमी झाले आहेत. एकूणच कोविड केंद्रांचाही भार हलका झाला आहे.

बीकेसी, वरळी आणि नेस्कोत सद्या 'इतके' रुग्ण घेताहेत उपचार

कोविड केंद्रांवरील रुग्णांचा भार कमी झाला आहे का? याबाबत 'ईटीव्ही भारत'ने तीन केंद्रांची माहिती घेतली. तेव्हा या तिन्ही केंद्रांमधील रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. बीकेसी कोविड केंद्रामध्ये 2000 खाटा आहेत. या केंद्रामध्ये काही दिवसांपूर्वी 1000 ते 1200 रुग्ण वा कधी यापेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत होते. पण, आज मात्र या केंद्रामध्ये 340 रुग्ण दाखल असल्याची माहिती बीकेसी कोविड केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश डेरे यांनी दिली आहे. या 340 पैकी 60 रुग्ण गंभीर असून ते अतिदक्षता कक्षात असल्याचेही त्यांनी सांगितले. नेस्को कोविड केंद्रामध्ये बीकेसीपेक्षा ही कमी रुग्ण आजच्या घडीला उपचार घेत आहेत. 2000 खाटांची क्षमता असणाऱ्या नेस्कोत आज 152 रुग्ण दाखल आहेत. यातील 18 रुग्ण गंभीर आहेत. काही महिन्यांपूर्वी या केंद्रांमध्ये 900 ते 1000 रुग्ण उपचार घेत होते, अशी माहिती नेस्को कोविड केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंड्राडे यांनी दिली. तर 500 बेड्सची क्षमता असलेल्या वरळी कोविड केंद्रामध्ये आज 52 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती येथील एका डॉक्टरने दिली आहे.

...पण काळजी घ्या

मुंबईत कोरोना नियंत्रणात आला आहे, कोरोना रुगांची संख्या कमी झाली आहे, ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. पण, म्हणून नागरिकांनी बिनधास्त-बेजबाबदार वागू नये. मास्क लावावा आणि नियम पाळावेत, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. दरम्यान, कोविड केंद्रांमधील रुग्ण कमी झाल्याने अतिरिक्त मनुष्यबळ कमी करण्यात आले आहे. डॉक्टर-नर्स यांना कमी करण्यात आले आहे. मात्र, त्यांना सेवामुक्त केलेले नाही. कधीही गरज पडली, रुग्ण वाढले तर तत्काळ मनुष्यबळ वाढवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही डॉ. आंड्राडे यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.