मुंबई - नुकतेच एसी लोकलचा तिकीट दरात 50 टक्के कपात केल्यानंतर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलच्या प्रवाशांनी चांगली पसंती दिली . भाडे कपातीपुर्वी एसी लोकलची प्रवासी संख्या 5 हजार 939 इतकी होती. आता एसी लोकलची प्रवासी संख्या 27 हजारांचा घरात गेली आहे. त्यामुळे मुंबईतील एसी लोकलला आता अच्छे दिन आले आहे.
गर्दीचा वेळी एसी लोकल प्रतिसाद - मध्य रेल्वेच्या उपनगरीय प्रवासी वातानुकूलित उपनगरीय लोकल ला उदंड प्रतिसाद मिळत आहे. वातानुकूलित लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फेब्रुवारी 2022 मधील दैनदिन सरासरी 5 हजार 939 प्रवाशांवरून मे- 2022 मधील दैनंदिन सरासरी 26 हजार 815 प्रवासी इतकी वाढली आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकल एकूण 1810 उपनगरीय लोकल सेवा चालविण्यात येत आहे. 14 मे 2022 पासून मुख्य मार्गावर (सीएसएमटी ते कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ) दरम्यान 12 वातानुकूलित सेवा वाढवल्याने मुख्य मार्गावरिल एकूण वातानुकूलित लोकल सेवांची संख्या 44 वरून 56 पर्यंत पोहोचल्या आहे. आता टिटवाळा आणि अंबरनाथ मार्गावरील प्रवासी गर्दीच्या वेळेत वातानुकूलित सेवेचा ही लाख प्रवाशांना घेता येत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे.
लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर - मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी आणि नाम निर्देशित सुट्टीच्या दिवशी 14 अतिरेक वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेचा इतर साधनांच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर असल्याचा दावा मध्य रेल्वेने केलेला. 34 किलोमीटर अंतरासाठी ( सीएसएमटी ते ठाणे) एकेरी प्रवासाचे भाडे 95 रुपये आहेत आणि 54 किलोमीटर अंतरासाठी (सीएसएमटी ते कल्याण) 105 रुपये आहे. हे भाडे वातानुकूलित ओला-उबेर सारख्या अँपबेस्ट टॅक्सी सेवेनाचा दरात पेक्षा किती तरी पट्टीने कमी आहे. त्यामुळेच आज वातानुकूलित लोकल सेवेला मोठा नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.
दहा दिवसांची अशी झाली एसी तिकीट विक्री-
सीएसएमटी स्थानक- 8 हजार 171 तिकिटे
डोंबिवली स्थानक- 7 हजार 534 तिकिटे
कल्याण स्थानक - 6 हजार 148 तिकीटे
ठाणे स्थानक- 5 हजार 887 तिकिटे
घाटकोपर स्थानक- 3 हजार 698 तिकिटे
एसी लोकलला आले 'अच्छे दिन' इतक्या पट्टीने वाढली प्रवासी संख्या! - मुंबई एसी लोकल प्रवासी संख्या वाढ बातमी
रविवारी आणि नाम निर्देशित सुट्टीच्या दिवशी 14 अतिरेक वातानुकूलित सेवा चालवण्याचा निर्णय घेतलेला आहे. शहर आणि उपनगरातील वातानुकूलित वाहतूक व्यवस्थेचा इतर साधनांच्या तुलनेत वातानुकूलित लोकलचा प्रवास सर्वात किफायतशीर असल्याचा दावा मध्य रेल्वेने केलेला. 34 किलोमीटर अंतरासाठी ( सीएसएमटी ते ठाणे) एकेरी प्रवासाचे भाडे 95 रुपये आहेत आणि 54 किलोमीटर अंतरासाठी (सीएसएमटी ते कल्याण) 105 रुपये आहे. हे भाडे वातानुकूलित ओला-उबेर सारख्या अँपबेस्ट टॅक्सी सेवेनाचा दरात पेक्षा किती तरी पट्टीने कमी आहे. त्यामुळेच आज वातानुकूलित लोकल सेवेला मोठा नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.