ETV Bharat / city

Omicron - राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर, ९ रुग्णांना डिस्चार्ज - ओमायक्रॉन रुग्ण आकडा महाराष्ट्र

जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Cases ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. आज नागपूर येथे एक रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर गेला आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 12, 2021, 7:54 PM IST

मुंबई - जगभरात ओमायक्रॉनचे रुग्ण ( Omicron Cases ) आढळून येत आहेत. राज्यात डोंबिवली, मुंबई, पुणे आणि पिंपरी - चिंचवड येथे आतापर्यंत ओमायक्रॉनचे १७ रुग्ण आढळून आले आहेत. आज नागपूर येथे एक रुग्ण ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा १८ वर गेला आहे.

हेही वाचा - Etv Bharat Special : तर पुन्हा आंदोलन करावे लागेल, माहुल प्रकल्पग्रस्तांचा इशारा

एकूण रुग्णांपैकी ९ रुग्ण बरे झाल्याने (Omicron Patient Discharge) त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे, नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नागपुरात नवा रुग्ण -

दक्षिण आफ्रिकेतून ५ डिसेंबर रोजी नागपूर येथे आलेला ४० वर्षीय पुरुष ओमायक्रॉन पॉजिटिव्ह आढळून आला आहे. सध्या त्याला एम्स नागपूर येथे विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्याला सौम्य लक्षणे आहेत. या रुग्णाने कोणतीही कोरोना प्रतिबंधक लस घेतली नव्हती. त्याच्या ३० निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला आहे. त्यांच्या कोरोना चाचण्या केल्या असता त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाला ११ एप्रिल २०२१ रोजी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळीही त्याला सौम्य लक्षणे होती. त्यावेळी त्याला रुग्णालयात भरती करण्याची गरज भासली नव्हती.

९ ओमायक्रॉनमुक्त रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात १ डिसेंबरपासून अती जोखमीच्या देशातून ११ हजार ७५१, तर इतर देशातून ६५ हजार ७७९, असे एकूण ७७ हजार ५३० प्रवासी राज्यात आले. त्यापैकी अती जोखमीच्या देशातील ११ हजार ७५१, तर इतर देशातील १ हजार ५२९, अशा एकूण १३ हजार २८० प्रवाशांच्या आरटीपीसीआर ( RTPCR Test ) चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामधून अती जोखमीच्या देशातून आलेले २२, तर इतर देशातून आलेले ८, अशा एकूण ३० प्रवाशांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग ( Genome Sequencing ) चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १८ प्रवाशांना ओमायक्रॉन विषाणूची ( Omicron Variant ) बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यापैकी ९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ नोव्हेंबरपासून विमानतळावर आलेल्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १०७ जणांचे नमुने जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी २६ जणांचा अहवाल अद्याप बाकी आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नागरिकांनी भीती बाळगू नये -

विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया असून याबाबत जनतेने भीती न बाळगता आपल्या नेहमीच्या व्यवहारात कोविड अनुरूप वर्तनाचा अंगिकार करावा, नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करावे. मागील महिनाभरात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करून भारतात आले आहेत, त्यांनीही आपल्याबाबत स्थानिक आरोग्य विभागास माहिती करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने सर्व जनतेला करण्यात आले आहे.

हेही वाचा - Legislative Council Election 2022 : पुढील वर्षात राज्यात राजकीय गणिते बदलणार, विधानपरिषदेचे १७ आमदार होणार निवृत्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.