ETV Bharat / city

26/11 Mumbai attacks : दहशतवाद्यांनी नातेवाईकाची हत्या केल्यानंतरही NSG प्रमुख जे.डी. दत्त यांनी चोख बजावले कर्तव्य

author img

By

Published : Nov 26, 2021, 5:01 PM IST

Updated : Nov 26, 2021, 5:31 PM IST

13 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशावर झालेला दहशतवादी हल्ला (Mumbai Terrorist Attack) कोणीही विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 (26/11 Terrorist Attack) रोजी पाक पुरस्कृत 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यामध्ये 174 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक जखमी झाले होते. यामध्ये एएसजी कंमोडोचे नेतृत्व करणाऱ्या ज्योती कृष्ण दत्त (NSG Commando Chief J K Dutt) यांनी या हल्ल्यात आपले नातेवाईक गमावल्यानंतरही सुरक्षा दलाचे नेतृत्व केले होते व दहशतवाद्यांवर विजय मिळवला होता

terrorists attack
terrorists attack

नवी दिल्ली - 13 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी देशावर झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाक पुरस्कृत 10 दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला होता. यामध्ये 174 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 300 हून अधिक जखमी झाले होते. यामध्ये एएसजी कंमोडोचे नेतृत्व करणाऱ्या ज्योती कृष्ण दत्त यांनी या हल्ल्यात आपले नातेवाईक गमावल्यानंतरही सुरक्षा दलाचे नेतृत्व केले होते व दहशतवाद्यांवर विजय मिळवला होता.

26 नोव्हेंबर 2008 रोजी लष्कर-ए- तोयबा या दहशतवादी संघटनेचे 10 दहशतवादी समुद्रीमार्गे मुंबईत घुसले होते. त्यांनी आर्थिक राजधानीत अनेक ठिकाणी हल्ले केले होते. 28 नोव्हेंबर पर्यंत सुरक्षा दलांने ताज हॉटेल सोडून अन्य सर्व स्थाने आपल्या ताब्यात घेतली होती. 29 नोव्हेंबर रोजी एनएसजी कमांडोंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला व दहशतवाद्यांनी यमसदनी पाठवले. केवळ एक दहशतवादी अजमल आमिर कसाब यांला जिवंत पकडण्यात आले त्याला 2012 मध्ये फाशी देण्यात आली.

राष्ट्रीय सुरक्षा दल (NSG) प्रमुख ज्योती कृष्ण दत्त यांनी या ऑपरेशनदरम्यान एलिट कमांडो फोर्सचे नेतृत्व केले होते. त्यांच्या एका नातेवाईकाचा या हल्ल्यात दहशतवाद्यांकडून मृत्यू झाल्याचे माहीत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य चालू ठेवले होते.

हे ही वाचा - 26/11 attack : 26/11 च्या हल्ल्यात प्राण वाचविणाऱ्या 'अनसंग हिरो'ची गोष्ट; यमाची भूमिका निभावणारा ठरला देवदूत

ज्योती कृष्ण दत्त यांचा मुलगा अनुज यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या वडिलांनी केलेल्या ऑपरेशनबद्दल अशा गोष्टी सांगितल्या ज्या कधी बाहेर आल्या नाही. 11 ऑगस्ट 2006 ते 28 फेब्रुवारी 2009 दरम्यान NSG महासंचालक असलेले 1971 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) पश्चिम बंगाल केडरचे अधिकारी दत्त यांचे कोविड-19 मुळे या वर्षी मे महिन्यात निधन झाले.

अनुजने सांगितले की, 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यावेळी दत्त यांनी सरकारी अधिकारी, राजकारणी, त्यांच्या दलातील कर्मचारी, मीडिया आणि अनेक लोकांपर्यंत मोबाईलवर संपकट केला होता. त्यांचे एक नातेवाईक दहशतवाद्यांनी बंधक केलेल्या हॉटेलच्या एका खोलीत अडकले होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असलेल्या 10 बंदूकधाऱ्यांनी हे हॉटेल ताब्यात घेतले होते. दत्त यांचे नातेवाईक हॉटेल ट्रायडंट येथे अडकले होते.

हे ही वाचा - 26/11 Mumbai Attack : कोणी कितीही इतिहास पुसण्याचे काम केले तरी ते शक्य होणार नाही - रुपाली चाकणकर

अनूज यांनी सांगितले की, त्यावेळी ते मुंबईत काम करत होते व 26 /11 च्या हल्ल्यावेळी ते कोलंबोला एका मीटींगसाठी गेले होते. 27 नोव्हेंबरला सकाळी 10 वाजता कोलंबो विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांना मुंबईवर हल्ला झाल्याचे समजले. मुंबईला जाणारी सर्व विमाने रद्द करण्यात आली होती. त्यामुळे अनूज चेन्नईला आले. तेथे त्यांनी टीव्हीवर पाहिले की, हॉटेल ट्रॉयडंटसमोरून त्यांचे वडील ज्योती कृष्ण दत्त मीडिया ब्रिफिंग करत होते. या हल्ल्यावेळी प्रसारमाध्यमांनी खूप उतावीळपणा केला व या हल्ल्याचे लाईव प्रक्षेपण केले. दत्त यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले की, तुम्ही मला हल्ल्यासंबंधीत महत्वाचा प्रश्न विचारा मुलाखत देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यावेळी माझे वडील दत्त यांना अनेक फोन कॉल्स आले. त्यांचा फोन सतत वाजत होता. राजकारणी नेते व मोठे अधिकारी त्यांच्या संपर्कात होते. मी मुंबईत आल्यानंतर वडिलांना फोन केला. त्यावेळी हॉटेलमध्ये अडकलेल्या आमच्या नातेवाईकाला दहशतवाद्यांनी मारले. दत्त यांनी ही माहिती खूप उशीरा समजली. त्यानंतरही त्यांनी आपले ऑपरेशन सुरू ठेवले व सर्व बंधकांनी मुक्त केले. माझ्या वडिलांनी सेवानिवृत्ती पत्करून चार वर्षे झाल्यानंतर या हल्ल्यात डेविड हेडलीचा हात असल्याचे समोर आले. या हल्ल्यात 174 नागरिक मृत्यूमुखी पडले यामध्ये 29 सुरक्षा दलाचे कर्मचारी व 26 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. या हल्ल्यात 300 जण जखमी झाले. त्याचबरोबर मृतांमध्ये दोन रेल्वे अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Last Updated : Nov 26, 2021, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.