मुंबई मुंबईला आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह पोलीस महासंचालकांच्या भेटीसाठी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. डोवाल यांनी राज्याचे डीजी रजनीश शेठ यांची भेट घेतली.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी राज्यासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी हल्ला आणि घातपाताच्या धमक्या येत असताना भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याची दखल घेत मुंबईत एंट्री केलेली दिसत आहे. कारण अजित डोवाल आज मुंबई दौऱ्यावर आले असून सकाळपासून त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट अजित डोवाल मुंबईत येताच त्यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचीही भेट घेतली. पुढे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी ते पोहोचले आहेत. शिंदेंच्या भेटीनंतर ते पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.