मुंबई: शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे कोणाला मिळणार ? अशा चर्चा रंगल्या होत्या. याचा वाद सर्वोच्च न्यायालयात होता. घटनापिठाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे वर्ग केले आहे. त्यानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह व शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानंतर आता राजकारणात खळबळ उडाली आहे. Sandeep Deshpande On Uddhav Thackeray या वादात आत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील उडी घेतली आहे. मनसेचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप देशपांडे MNS leaders Sandeep Deshpande यांनी आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
भोळा चेहरा करून खोटं बोलणं यावेळी बोलताना देशपांडे म्हणाले की, या आधीच मी बोललो होतो खोटं बोललं, की देव कान कापतो आणि तेच आता झालेलं दिसतंय. ठाकरे कुटुंबात असा एकही व्यक्ती मी पाहिलेला नाही, जो आपला भोळा साधा चेहरा घेऊन जनतेत जातो आणि रेटून खोटे बोलतो. Sandeep Deshpande On Uddhav Thackeray तसं उद्धव ठाकरे करतात. उद्धव ठाकरे आपल्या साध्या भोळ्या चेहऱ्याआडून नेहमीच खोटे बोलत आलेले आहेत. आणि आता त्याचे शिक्षा त्यांना मिळालेली दिसते, अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह वापरण्यावर निवडणूक आयोगाने तात्पुरती घातलेली बंदी हा दोन्ही गटांवर अन्याय असल्याचे म्हटले आहे. जूनमध्ये शिवसेना फुटल्यानंतर ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही गट खरी शिवसेना असल्याचा दावा करत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी मागत आहेत.
नव्या चिन्हाचा शोध सुरू: अंधेरी पोटनिवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठावले. राज्यात यावरुन आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. निवडणूक आयोगाने सोमवार पर्यंत चिन्ह आणि पक्षाच्या नावाचा विचार करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाकडून नव्या चिन्हाचा शोध सुरू आहे.
सोमवारी निर्णय: केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सध्याच्या घडीला 197 निवडणूक चिन्ह उपलब्ध आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला यापैकी तीन चिन्हाचा पर्याय दिला जावू शकतो. आता दोन्ही गट कोणते चिन्ह घेतात हे सोमवारी समोर येणार आहे. दोन्ही त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारे चिन्ह निवडू शकतात. पोटनिवडणुकांसाठी दोन्ही गटांना 10 ऑक्टोबर दुपारी 1 वाजेपर्यंत हे सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.