मुंबई - अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच निकाल दिला जाणार आहे. त्याला अनुसरून राज्यात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. अयोध्या प्रकरणी राज्यातील संवेदनशील परिसरांमध्ये अधिक सुरक्षा बल तैनात करण्यात यावे, अशी सूचना केंद्राकडून राज्य सरकारला देण्यात आलेली आहे. अयोध्या प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहावे असे केंद्राने म्हटले आहे .
मुंबईसारख्या शहरात सुद्धा संवेदनशील परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी गुरुवारी राज्याच्या राज्यपालांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती करून दिली. याबरोबरच मुंबई शहरातील वेगवेगळ्या समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याचं काम मुंबई पोलिसांकडून केले जात आहे.