ETV Bharat / city

Khervadi Police Notice To Rana : मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्याला नोटीस; '...तर तुम्ही जबाबदार' - Khervadi Police Notice To Rana

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे ( navneet rana ravi rana recite hanuman chalisa ) जाहीर आवाहन केले होते. त्या अनुषंगाने आज रवी राणा दाम्पत्य त्यांच्या खार येथील निवासस्थानी दाखल झाले. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये या कारणासाठी खेरवाडी पोलिसांकडून आमदार रवी राणा यांना 149 ची नोटीस ( Khervadi Police Notice To Rana Couple ) देण्यात आली आहे.

Khervadi Police Notice To Rana couple
मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्याला नोटीस
author img

By

Published : Apr 22, 2022, 2:18 PM IST

Updated : Apr 22, 2022, 4:11 PM IST

मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्याचे ( navneet rana ravi rana recite hanuman chalisa ) जाहीर आवाहन केले होते. त्या अनुषंगाने मुंबईभर वातावरण तापलेले असताना आज रवी राणा दाम्पत्य त्यांच्या खार येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी केलेल्या आवाहनाला शिवसेनेकडून सडेतोड उत्तर देण्यासाठी आज मुंबईत विविध ठिकाणी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. म्हणून कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये या कारणासाठी खेरवाडी पोलिसांकडून आमदार रवी राणा यांना 149 ची नोटीस ( Khervadi Police Notice To Rana Couple ) देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांची राणा दाम्पत्याला नोटीस

हनुमान चालीसा पठण करण्यावरून वाद - मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालीसा पठण करण्यासाठी राणा दांपत्य यांनी दिलेले आव्हान शिवसैनिकांनी स्वीकारले होते. यावरून मागील तीन-चार दिवसांपासून वातावरण तापू लागले. आज पहाटे राणा दांपत्य मुंबईत दाखल झालंय. परंतु त्याचा थांगपत्ता कुणालाच नव्हता, शेवटी ते त्यांच्या खार येथील निवासस्थानी असल्याचे समजल्यानंतर खेरवाडी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना 149 ची नोटीस दिली आहे.

Khervadi Police Notice To Rana
पोलिसांनी दिलेली नोटीस

काय आहे नोटीस मध्ये? - सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतेही दखलपात्र गुन्ह्याचे कृत्य प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्या करू नये अशी विनंती त्यात करण्यात आली आहे. अन्यथा तसे केल्यास दखलपात्र गुन्ह्याची वृत्त घडल्यास त्यासाठी आपणास जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल आणि सदरची नोटीस संबंधित सक्षम न्यायालयात आपण व आपल्या सहकार्याबद्दल पुरावा म्हणून वापरण्यात येईल, असे त्यात सांगण्यात आलेल आहे.

हेही वाचा - Navneet Rana vs Shivsena : शिवसैनिकांना हुलकावणी देत राणा दाम्पत्य मुंबईत दाखल; मातोश्रीवरील सुरक्षेत वाढ

Last Updated : Apr 22, 2022, 4:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.