ETV Bharat / city

मुंबईत सर्व खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्टची सुविधाच नाही, केंद्र शोधायची कुठे?

author img

By

Published : Jul 9, 2020, 11:44 AM IST

Updated : Jul 9, 2020, 11:54 AM IST

रुग्णांचे निदान वेळीच झाल्यास वेळेत उपचार सुरू करणे शक्य होत असल्याने संबंधित रुग्ण लवकर बरा होण्याची संभाव्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रिप्शन' शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला आहे, तसे परिपत्रकही आयुक्तांनी काढले आहे.

private labs
मुंबईत सर्व खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्टची सुविधाच नाही

मुंबई - महानगरामध्ये कोरोनाचे रुग्ण लवकर समोर आल्यास त्यांच्यावर उपचार करता यावेत म्हणून महापालिकेने डॉक्टरांच्या प्रिस्किप्शन शिवाय कोविड कोरोना 19 ची टेस्ट करता येईल, असे जाहीर केले. मात्र, महापालिकेने जाहीर केलेल्या अनेक लॅबच्या मोजक्याच केंद्रांमध्ये टेस्ट केल्या जात असल्याने टेस्ट करू इच्छिणाऱ्या लोकांना खरोखर दिलासा मिळाला का असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णांची टेस्ट मोठ्या संख्येने करण्यासाठी खासगी लॅबच्या सर्व केंद्रांवर कोरोनाची टेस्ट करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी काढण्याची गरज आहे.

मुंबईत सर्व खासगी लॅबमध्ये कोरोना टेस्टची सुविधाच नाही, केंद्र शोधायची कुठे?

कोरोना विषाणूच्या रुग्णांचे लवकर निदान व्हावे म्हणून मुंबई महापालिकेने आपल्या व राज्य सरकारच्या रुग्णालयासह 17 खासगी लॅबना कोविड 19 म्हणजेच कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी दिली. टेस्ट करण्यासाठी आधी खासगी लॅबना 4500 रूपये शुल्क घेण्याची परवानगी होती. राज्य सरकारने नुकतेच या शुल्कात कपात करून 2200 रुपये इतके शुल्क निश्चित केले आहे. घरी जाऊन टेस्ट करावयाची असल्यास 2800 रुपये शुल्क घ्यावेत असा सरकारने नियम केला आहे. रुग्णांचे निदान वेळीच झाल्यास वेळेत उपचार सुरू करणे शक्य होत असल्याने संबंधित रुग्ण लवकर बरा होण्याची संभाव्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळांना डॉक्टरांच्या 'प्रिस्क्रिप्शन' शिवाय कोविड विषयक वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नुकताच घेतला आहे, तसे परिपत्रकही आयुक्तांनी काढले आहे.

मुंबईमध्ये खासगी प्रयोग शाळांशी संपर्क साधला असता, अनेक प्रयोगशाळांच्या विभागवार केंद्रांमध्ये कोरोनाची टेस्टच होत नसल्याचे समोर आले आहे. एसएलआर या लॅबच्या गोरेगांव येथील मुख्य केंद्रात एकमेव ठिकाणी कोरोना टेस्ट केली जाते. मेट्रोपोलीस या लॅबवर पालिकेने बंदी घातली आहे. ही बंदी उद्या उठवली जाणार आहे. मुंबईत या लॅबच्या फक्त तीनच केंद्रांवर कोरोना टेस्ट केली जाणार आहे. मुंबईत बहुतेक विभागात खासगी लॅबची केंद्र आहेत. त्यामधील सर्व केंद्रांवर टेस्ट होत नसल्याने रुग्णांना ज्या ठिकाणी टेस्ट होते त्या ठिकाणी टेस्ट करण्यासाठी पोहोचावे लागणार आहे. अशीच परिस्थिती बहुतके खासगी लॅबची आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची भीती आहे.

सर्वत्र टेस्ट होण्याची गरज -

कोरोना रुग्णाचे निदान लवकर होण्यासाठी खासगी प्रयोग शाळांमध्ये टेस्टसाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले. मात्र पालिकेने जाहिर केलेल्या खासगी लॅबकडून मोजक्याच केंद्रांवर टेस्ट केली जात आहे. रुग्ण राहत असलेल्या विभागात लॅबचे केंद्र नसेल तर रुग्णांना प्रवास करून टेस्ट करावी लागणार आहे. सर्वच रुग्णांकडे पैसे असतील असे नाही. त्यामुळे घरी टेस्ट करून घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असणार आहे. टेस्ट करण्यासाठी केंद्रापर्यंत रुग्णांना प्रवास करावा लागणार असल्याने सदर रुग्ण अनेकांच्या संपर्कात येऊन इतरांना कोरोनाची लागण देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खासगी लॅबची सर्व विभागात केंद्र आहेत त्या ठिकाणी कोरोनाची टेस्टची सुविधा उपलब्ध होण्याची गरज आहे, अशी माहिती एका खासगी लॅबच्या संचालकाने आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

खासगी लॅबची नावे -

थायरोकेअर, सबर्बन, एच एन रिलायन्स, मेट्रोपोलीस, एसआरएल, इन्फेक्शन, कोकीलाबेन, एसआरएल फडके, इजेनेटिक्स, पिडी हिंदुजा, क्वालिलाईफ डायगनोस्टिक्स, डॉ. जरिवाला, नानावटी हॉस्पिटल, सनफ्लॉवर, एनएम मेडिकल, जसलोक, लाईफ केअर डायग्नोस्टिक या 17 खासगी लॅबना कोरोना टेस्ट करण्याची परवानगी दिली आहे.

Last Updated : Jul 9, 2020, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.