ETV Bharat / city

18 ते 44 वर्षे वयोगट लसीकरण; कोविनसह आरोग्य सेतूमधील नोंदणीला 'ब्रेक'

author img

By

Published : Apr 29, 2021, 5:34 PM IST

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने वयोगट 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण जिल्हा प्रशासनाला अडचणी येत आहेत. तसेच लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असताना कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे.

18 ते 44 वर्षे वयोगट लसीकरण
18 ते 44 वर्षे वयोगट लसीकरण

मुंबई - केंद्र सरकारने 1 मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण करण्याचे जाहीर केले असले तरी राज्यातील परिस्थिती वेगळी आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या लशींचा राज्यात तुटवडा आहे. त्यामुळे कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरून नोंदणी तरी लसीकरणाची तारीख मिळत नसल्याचा अनेकांना अनुभव येत आहे.

एकीकडे सरकारकडून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिने लसीकरणासाठी नागरिकांना आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र, मागणीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात लसीचा पुरवठा होत आहे. यामुळे जिल्ह्यातील प्रशासनाला नेमकी लसीकरण मोहीम कशी हाताळावी? हा प्रश्न समोर येत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने वयोगट 45 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण जिल्हा प्रशासनाला अडचणी येत आहेत. तसेच लसीकरण केंद्रावर नागरिकांची गर्दी होत असताना कोरोनाच्या संसर्गाचा धोका वाढत आहे.

हेही वाचा-लसीकरण करण्यासंदर्भात राज्य सरकारने योग्य पद्धतीने नियोजन करावे - पंकजा मुंडे

18 ते 44 वयोगटासाठी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी

मुंबईतील 1 मे रोजी असलेली लसीकरण केंद्रे

केंद्र सरकारने 1 मेपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविन अथवा आरोग्य सेतू अॅपवरून नोंदणी करण्याचे आवाहन केले. राज्यातील अनेक नागरिकांनी नोंदणी केली आहे. मात्र, लसीकरण केंद्र व तारीख निवडल्यानंतर केवळ 45 वर्षांहून अधिक वयोगट असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरू असल्याचा संदेश अॅपमध्ये दिसत आहे. हीच परिस्थिती मुंबईसह राज्यांमधील विविध जिल्ह्यांतील लसीकरण केंद्र निवडताना दिसून आली आहे.

लसीकरण 45 वर्षांहून अधिक वयोगटासाठी असलेला संदेश

हेही वाचा-मुंबई : लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांची गर्दी; सहकार्य करण्याचे डॉक्टरांचे आवाहन

लसीकरण लांबण्याच्या मार्गावर -

1 मेपासून 18 वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, लसीच्या उपलब्धते अभावी हा उपक्रम लांबण्याच्या मार्गावर आहे. '18 ते 44 वयोगटातील सर्वांना ही लस मिळावी, असा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतेच जालनामध्ये बोलताना सांगितले. कोविशिल्डचे 20 मेपर्यंत जेवढे उत्पादन होईल, तेवढ्याच लसी केंद्राच्या माध्यमातून वितरीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पर्यायी व्यवस्था म्हणून भारत बायोटेकशी चर्चा सुरू असून या दिशेनेदेखील प्रयत्न सुरू असल्याचे टोपे म्हणाले.

हेही वाचा-...तर लसीकरण लवकर होईल; खासदार विनायक राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

मे महिन्याच्या अखेरीस लसीकरण

राज्यातील 18 ते 44 वयोगटातील 5 कोटी 71 लाख व्यक्तींना मोफत लसीकरणाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, खासगी रुग्णालयात लसींसाठी पैसे मोजावे लागतील, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १ मेपासून लसीकरणाला सुरुवात होणार नाही. तसेच लसीकरण कार्यक्रमाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत असून नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही टोपे यांनी बुधवारी (28 एप्रिल) स्पष्ट केले.

दरम्यान, देशभरात कोरोनाबाधितांचे व मृत्यूचे प्रमाण वाढता सर्वच वयोगटांसाठी लसीकरणाची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे लसीकरण राज्यात कधी सुरू होणार याकडे तरुणाईचे लक्ष लागलेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.