ETV Bharat / city

Notice To Prasad Lad : अद्याप कोणतीही नोटीस नाही; आमदार लाड यांचा खुलासा

author img

By

Published : Mar 24, 2022, 10:42 AM IST

Updated : Mar 24, 2022, 10:57 AM IST

मुंबई बँकेत संचालक असलेल्या आमदार प्रसाद लाड यांनी बँकेत पगारदार मजूर म्हणून खोटी माहिती दिली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी केले होता. (Notice To Prasad Lad) त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांना नोटीस मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

आमदार प्रसाद लाड
आमदार प्रसाद लाड

मुंबई - मुंबई बँकेत मजूर मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणी वाढतच आहेत. दरम्यान, आता मुंबई बँकेत संचालक असलेल्या आमदार प्रसाद लाड यांनीही बँकेत पगारदार मजूर म्हणून खोटी माहिती दिली असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी केले होता. (Mumbai Bank Labor Case) त्या पार्श्वभूमीवर आमदार प्रसाद लाड यांना नोटीस मिळाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला - याबाबत आमदार प्रसाद लाड यांना विचारले असता आपल्याला कोणतीही नोटीस मिळालेली नाही. तसेच, या प्रकरणात आपल्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. केवळ आपल्यावर दबाव आणण्यासाठी अशा प्रकारचे आरोप काही लोकांकडून केले जात आहेत अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली आहे. दरम्यान, आम्हाला कितीही घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला तरी आम्ही त्यांना चोख प्रतिउत्तर देऊ असही लाड म्हणाले आहेत.

कोर्टाने निकाल देण्याआधी केस मागे घेण्यात आली - या मुद्द्यावरून शिवसेनेच्या एका नेत्याने आपल्यावर सहा ते सात वर्षापूर्वी कोर्टात दावा केला होता. मात्र, तेव्हाही या विरोधात कोणतेही पुरावे नव्हते. त्यामुळे या प्रकरणी कोर्टाने निकाल देण्याआधी केस मागे घेण्यात आली. त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ आरोप केले जात आहेत. केवळ भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला घाबरवण्याचा हा प्रयत्न आहे असही ते म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात आप राज्य सरकारची 'बी'टीम' - आम आदमी पक्षाकडून आपल्यावर अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत. मात्र महाराष्ट्रामध्ये आप ही राज्य सरकारची बी टीम आहे. राज्यसरकारने एकच नाहीतर तीन बी टीम ठेवलेल्या आहेत. मुंबई पोलीस आयुक्त सहकार खाते आणि आप पक्ष अशा तीन बी टीम राज्य सरकारने महाराष्ट्रात केल्या असल्याचा आरोप आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी केला.

हेही वाचा - Ukraine-Russia War 29th day : युक्रेनमध्ये 7,000 ते 15,000 रशियन सैन्य मारले गेले

Last Updated : Mar 24, 2022, 10:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.